प्लास्टिक स्टूल, लाठी, पीव्हीसी पाईपने पतीकडून सोन्यासारख्या पत्नीचा खून, पुण्यातील चाकणमध्ये काय घडलं?

pune crime : पुण्यातील चाकणमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 23 वर्षीय पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याचं कारण समोर आलं.

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील चाकण हदरलं

point

पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय

point

नेमकं काय घडलं? 

pune crime : पुण्यातील चाकणमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 23 वर्षीय पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केला. ही घटना चाकण येथील खरबडवाडी येथे 7 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनं खरबडवाडीत एकच खळबळ माजली आहे. आरोपी पतीचं नाव सचिन रामआसरे यादव असे आहे. महिलेचं नाव अंतिमा पांडे (वय 38) असे आहे, संबंधित प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

हे ही वाचा : उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट? महाराष्ट्रातील 'या' चाली पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या एका अहवालानुसार, आरोपीने त्याच्या पत्नीला परपुरूषाकडे बघितल्याचा पतीने आरोप केला. याच आरोपावरून दोघांमध्ये जोराचा वाद उफळला. रागाच्या भरात त्याने प्लास्टिक स्टूल, लाठी, पीव्हीसी पाईप आणि इतर वस्तूंनी तिच्यावर क्रूरपणे हल्ला केला. त्यानंतर त्याने डोक्यासह संपूर्ण शरीरावर वार करत गंभीर जखमी केले. 

या जोडप्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. जेव्हा त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आणि नंतर पत्नीला मारहाण करण्यात आली, अशी माहिती तपासातून समोर आली. पत्नीला वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी, पीडित पत्नी मरण पावली.

एका महिलेनं महाळुंगे एमआयडीसीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाच पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण योग, काही राशीतील लोकांचं नशीब फळफळेल, तुमच्या राशीचं भविष्य घ्या जाणून

पुण्यात वाढती गुन्हेगारी 

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ राज्यातच नाही,तर देशात अनैतिक संबंधामुळे खूनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याच घटनेची पुनरावृत्ती ठिकठिकाणी होताना दिसते. केवळ राज्यच नाही,तर आता देशात अशा घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. दरम्यान, पुणे शहर हे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचं हॉट्स्पॉट बनलं आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp