उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट? महाराष्ट्रातील 'या' चाली पाहून तुम्हीही हैराण व्हाल!
Maharashtra Politics : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तणाव वाढत आहे, तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढत आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीआधी काही मोठ्या आणि अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढली
बीएमसी निवडणुकीत भाजप-शिवसेना यूबीटी युती होणार?
शिंदेंची सातत्याने सुरू आहे दिल्लीवारी
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सत्ताधारी युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सध्या कोणीही असा दावा करू शकत नाही. गेल्या काही आठवड्यात राज्यात राजकीय बदलाच्या जोरदार सुरू आहेत. आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत. जर आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने समजून घेतल्या तर असे म्हणता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरीच धुसफूस आहे. म्हणूनच गेल्या पंधरवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा दिल्ली दौरा केला. मंगळवारी रात्री उशिरा ते पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले. बुधवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेटही त्यांनी घेतली. तर दुसरीकडे, शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील दिल्लीत पोहोचले. ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत.
फडणवीस-ठाकरेंची मैत्री
खरं तर, गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. फडणवीस यांनी उद्धव यांना विधानसभेत खुलेआम महायुतीत येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर, एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठकही झाल्याची जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत, रिव्हर्स ऑपरेशन लोट्स अन्...
उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना नुकतेच अनेक प्रसंगीही भेटले आहेत. त्यावेळी ते अत्यंत खेळीमेळीने गप्पा-गोष्टी करताना दिसून आले आहेत. खरं तर राजकारणात कोणतीही बैठक विनाकारण होत नाही. अशा प्रत्येक बैठकीमागे काही ना काही गुपित दडलेलं असतं.
आता आपण राज्याच्या राजकारणाकडे येऊया. सध्या राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे प्रचंड किंवा त्याहून अधिक बहुमत आहे. महायुतीला 2024 च्या विधानसभेत एकतर्फी विजय मिळाला. अशा परिस्थितीत, भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले परंतु त्यांना युतीतील इतर मित्रपक्षांशी, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याशी, कठीण सौदेबाजीला सामोरे जावे लागले.










