मुंबईत खळबळ! बेवफा पत्नीने BF च्या मदतीनं पतीला संपवलं..13 वर्षांच्या मुलीनं पोलिसांना सांगितली A To Z स्टोरी
Mumbai Crime News Today : स्वत:च्या डोळ्यांसमोर पतीची धुलाई, गंभीर दुखापत झाल्यानंतरही उपचार न करता 3 दिवस घरीच ठेवलं आणि मृत्यू झाल्यावर अपघाताचं नाटक..पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर धक्कादायक घटना घडल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

गोरेगावमध्ये पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली

डोळ्यांसमोर पतीला मारला, पण पत्नीने वाचवलं नाही

पत्नीने बाईक अपघाताचं कारण दिलं आणि..
Mumbai Crime News Today : स्वत:च्या डोळ्यांसमोर पतीची धुलाई, गंभीर दुखापत झाल्यानंतरही उपचार न करता 3 दिवस घरीच ठेवलं आणि मृत्यू झाल्यावर अपघाताचं नाटक..पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर धक्कादायक घटना घडल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पतीची हत्या करणाऱ्या महिलेला आता पोलिसांनी अटक केली आहे. 13 वर्षांच्या मुलीची साक्ष नोंदवल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. या मुलीनं तिच्या वडिलांची आईनं कशाप्रकारे हत्या केली, याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सांगितली. भरत लक्ष्मण अहिरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या हत्याप्रकरणी आरे कॉलनी पोलिसांनी आरोपी राजश्री अहिरेला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
गोरेगावमध्ये पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली
मुंबईच्या गोरेगावमध्ये एक महिला मेकअप आर्टिस्ट राजश्री अहिरेनं तिचा पती भरत लक्ष्मण अहिरेची हत्या केली. त्यानंतर आरोपी राजश्रीला पोलिसांनी अटक केली. मुंबईच्या आरे कॉलनीत पोलिसांनी 35 वर्षीय राजश्री अहिरेला तिच्या प्रियकरासोबत मिळून पती लक्ष्ण अहिरेच्या हत्येचा कट रचल्याने अटक केलीय. या हत्याप्रकरणी सामील असलेला आरोपी चंद्रशेखर पडायाची आणि त्याचा सहकारी सध्या फरार आहे. रिपोर्टनुसार, प्रेमप्रकरणामुळे पती-पत्नीत वाद विवाद झाले होते. त्यानंतर भरतने चंद्रशेखरला फोन करून बोलवलं. त्याची पत्नी राजश्रीही तिथे पोहोचली. 15 जुलैच्या रात्री त्या दोघांमध्ये मारहाण झाली.
हे ही वाचा >> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी
डोळ्यांसमोर पतीला मारला, पण पत्नीने वाचवलं नाही
चंद्रशेखरने भरतच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या अन्य भागात त्याला मारहाण केली. तसच चंद्रशेखरचा सहकारी रंगाने भरतला मागे पकडून ठेवलं होतं. हल्ला झाल्यानंतर पत्नी राजश्रीने कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप केलं नाही. तसच पतीला वाचवण्यासाठी कोणतीही मदत मागितली नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोक एकत्र झाले पण तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पतीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिने त्याला घरी नेलं आणि तीन दिवस तसच रुममध्ये बंद करून ठेवलं. याचदरम्यान, दाम्पत्याच्या दोन मुलींनी त्यांचे वडील जखमी झाल्याचे पाहिले. 13 वर्षाच्या मुलीने या घटनेबाबत नातेवाईकांना सांगितलं.
पत्नीने बाईक अपघाताचं कारण दिलं आणि..
राजश्रीने हे प्रकरण लपवून दावा केला की, भरत एका दुचाकी अपघातात जखमी झाला होता. पतीला मालाडमधील एका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं होतं. 5 ऑगस्टला उपचारादरम्यान भरतचा मृत्यू झाला. दरम्यान, 13 वर्षांच्या मुलीची साक्ष नोंदवल्यावर आरे कॉलनीतील पोलिसांनी राजश्रीला अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.