पतीला दगडाने ठेचलं.. पत्नीला दुसराच पुरूष आवडायचा, लग्नाच्या 45 व्या दिवशीने नव्या नवरीने सगळ्यांना हादरवलं
Wife Killed Husband Crime News : झारखंडच्या पलामू येथे राहणाऱ्या एका तरुणाने दीड महिन्यांपूर्वी थाटामाटात लग्न करून नवरीला घरी आणलं होतं. पण नंतर घडली सर्वात भयंकर घटना..

बातम्या हायलाइट

पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या

झाडाच्या पाळापाचोळ्यात पतीचा मृतदेह लपवला अन्..

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Wife Killed Husband Crime News : झारखंडच्या पलामू येथे राहणाऱ्या एका तरुणाने दीड महिन्यांपूर्वी थाटामाटात लग्न करून नवरीला घरी आणलं होतं. पण जरीही कल्पना नव्हती की, ज्या तरुणीसोबत त्याने लग्न केलं आहे, तीच पत्नी त्याची हत्या करेल.तरुणीला तिचा नवरा पसंत नव्हता. ती दुसऱ्या तरुणावर प्रेम करायची. याबाबत तिच्या पतीला माहित नव्हतं.कुटुंबाच्या दबावाखाली तरुणीने लग्न तर केलंच, पण नंतर प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केला.
पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत फिक्स केलं. दीड महिन्यांपूर्वी लग्नानंतर तरुणीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा प्लॅन केला आणि 31 जुलैला त्याचा काटा काढला. ही धक्कादायक घटना नवाजयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिंजो गावात घडली.
दीड महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
पलामू पोलीस अधीक्षक रेष्मा रमेशन यांनी म्हटलंय की, तरुणी पलामूच्या नवाजयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिंजो येथील रहिवासी आहे. 22 जून रोजी तिचं लग्न सरफराज नावाच्या मुलासोबत झालं होतं. पण लग्नाच्या काही दिवसानंतर दोघेही वेगवेगळे राहत होते. पोलिसांनी म्हटलं की,आरोपी पत्नीने पती सरफराजला जंगलात बोलावलं होतं. पतीही तिला भेटायला जंगलात पोहोचला. पण तिथे पत्नीचा प्रियकरही होता. त्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची दगडाने ठेचून हत्या केली.
हे ही वाचा >> टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...
फरार आरोपीचा शोध सुरु
पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. एसपी रेष्मा रमेशने म्हटलं की अल्पवयीन मुलीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. मृत व्यक्ती लातेहार जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीतील दही गाव येथील रहिवासी आहे. पत्नीने त्याची जंगलात हत्या केली. त्यानंतर मृतदेह पानांच्या झाली लपवला होता.एसपीने म्हटलं की, तरुणीने खुलासा करत सांगितलं की,तिनेच तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, आरोपी तरुणीच्या प्रियकराचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.