भटक्या कुत्र्याच्या तोंडात माणसाच्या हाताचा तुकडा, व्यक्तीनं पाहिलं अन् फुटला घाम, एका झटक्यातच...
crime news : एका झुडपातून एक कुत्रा बाहेर आला असता, त्याच्या तोंडात मानवी हात दिसला, हे चित्र पाहून एका व्यक्तीला घामच फुटला. याच घटनेदरम्यान नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

बातम्या हायलाइट

कुत्र्याच्या तोंडात माणसाचा हात

चित्र पाहून माणसाचा फुटला घाम

झुडपात काय झालं?
crime news : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात गुरूवारी सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका झुडपातून एक कुत्रा बाहेर आला असता, त्याच्या तोंडात मानवी हात दिसला, हे चित्र पाहून एका व्यक्तीला घामच फुटला. त्याने फोनद्वारे संपर्क करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्या व्यक्तीने हे भयंकर चित्र पाहिले तेव्हा भटकी कुत्र्याच्या तोंडात एका माणसाचा हात दिसत होता. संबंधित प्रकरण अगदीच गंभीर होऊन गेले होते. जिथून कुत्रा बाहेर आला ते तुमकुरू जिल्ह्यातील चिंपगनहल्ली गावाजवळील घटना आहे. ही घटना समजताच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखले.
हे ही वाचा : विकृतीचं टोक! महिला शौचासाठी गेली जंगलात, ट्रॅक्टरवाल्यांची पडली वाईट नजर, अन् सर्वांनी मिळून तिथेच...
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास करण्यास सुरुवात केली असता, धक्कादायक कारण समोर आलं. पोलिसांना घटनास्थळावर एका व्यक्तीच्या शरीरीचे तुकडे सापडले होते. हेच तुकडे विविध ठिकाणी 3 किमीच्या अंतरावर विखुरलेल्या स्वरुपात पसरले होते. एकूण काही तुकडे कुजलेल्या स्वरुपात सापडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूण शरीराच्या तुकड्यांपैकी डोक्याचा भाग कुठेही सापडला नाही.
ती हाडं महिलेच्या शरीराची
मृतदेहाचे तुकडे अलिकडेच फेकल्याचं दिसून येतंय. तुकडे कुजल्यानंतर लक्षात आले की, याला बरेच दिवस झाले असावेत. दरम्यान, पोलिसांना मृतदेहाची कसलीही ओळख पटलेली नाही, परंतु सुरुवातीच्या एकूण तपासातून असे दिसले की, ती हाडं महिलेच्या शरीराची आहेत.
हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाचा शुल्लक कारणावरून खून, कामावरून परतत असतानाच... नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बंगळुरूहून फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडल पाचारण करण्यात आले आहे. हे पथक आता संपूर्ण परिसराचा शोध घेताना दिसत आहेत. यातून आणखी कोणती माहिती मिळण्याची शक्यता आहे याचा शोध सुरु आहे. खून कुठे झाला? मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले गेले? सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृतदेह कोणाचा आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.