"रात्री झोपण्यासाठी मुलगी पाहिजे...", हॉटेलमध्येच तरुणाची सटकली! Reception मध्येच केला गोळीबार अन् जे घडलं..

Today Shocking Viral News :  उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका तरुणाने चक्क हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार केला. या माथेफिरू तरुणाने हॉटेल मालकाकडे रात्रीसाठी मुलीची मागणी केली होती.

(प्रतीकात्मक चित्र)

(प्रतीकात्मक चित्र)

मुंबई तक

• 07:29 PM • 09 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने रात्री झोपण्यासाठी हॉटेल मालकाकडे केली मुलीची मागणी

point

तोंडाला रुमाल बांधून आरोपीने असं काही केलं..

point

त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Today Shocking Viral News :  उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका तरुणाने चक्क हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार केला. या माथेफिरू तरुणाने हॉटेल मालकाकडे रात्रीसाठी मुलीची मागणी केली होती. त्याने म्हटलं होतं की, एका रात्रीसाठी मुलगी पाहिजे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्याला नकार दिला, तेव्हा त्याची सटकली अन् त्याने हॉटेलमध्ये अंदाधूंद गोळीबार केला. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. थरकाप उडवणारी ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान, राज असं आरोपीचं नाव असून तो टीपीनगर विभागातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बंदूकही जप्त केलीय.

हे वाचलं का?

त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांनी व्हिडीओ फुटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केलीय. ही धक्कादायक घटना मेरठ येथील टीपीनगरच्या वेदव्यासपूरी येथील हॉटेलमध्ये घडली. गोळीबारीच्या या घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. मेरठच्या वेदव्यासपूरीमध्ये डिवाईड रोडवर एक हॉटेल आहे. हॉटेलला सुमित आणि अमित दोघेही चालवतात. सुमितने म्हटलं की, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता एक तरुण दुचाकीवर आला होता आणि त्याने मुलगी ऑफर करण्याचं म्हटलं होतं.

हे ही वाचा >> 'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सुमितने म्हटलं की, तरुणाच्या अशाप्रकारच्या मागणीमुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तरुणाला सांगितलं की, अशाप्रकारचं काम हॉटेलमध्ये होत नाही. त्यानंतर तरुण अचानक भडकला. त्यानंतर त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली. त्या तरुणाने अशाप्रकारची अनोखी मागणी का केली आणि तो इतरा सैरावैरा का झाला, असा प्रश्न हॉटेल स्टाफला पडला. हॉटेल कर्मचाऱ्याने नकार दिल्यानंतर तरुण संतापला आणि त्याने धमकीही दिली.

तोंडाला रुमाल बांधून आरोपीने असं काही केलं..

आरोपी तरुण जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास पुन्हा तोंडावर रुमाल बांधून आला आणि हॉटेलवर फायरिंग केली. त्याने फायरिंग केल्यावर गोळी आरशाला लागली. त्याचदरम्यान, काऊन्टरवर असलेल्या सुमितने लपून त्याचा जीव वाचवला. त्यानंतर पोलीस तातडीने पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. राज असं आरोपीचं नाव असून तो टीपीनगर विभागातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बंदूकही जप्त केलीय.

हे ही वाचा >> 'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

    follow whatsapp