एकाच नवऱ्याच्या दोन बायका! पतीला दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच... संतापलेल्या पत्नीने केलं असं काही...

नवरा बायकोच्या वादातून संतापलेल्या पत्नीने तिच्या पतीचं गुप्तांगच कापल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित महिलेने तिच्या पतीवर चाकूने वार केले आणि घटनेनंतर पतीला जखमी अवस्थेत सोडून पत्नी पळून गेली. नेमकी घटना काय?

पतीला दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच...

पतीला दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच...

मुंबई तक

• 02:58 PM • 10 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकाच नवऱ्याच्या दोन बायका...

point

पत्नीने दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच कापलं..

Crime news: उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरा बायकोच्या वादातून संतापलेल्या पत्नीने तिच्या पतीचं गुप्तांगच कापल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित महिलेने तिच्या पतीवर चाकूने वार केले आणि घटनेनंतर पतीला जखमी अवस्थेत सोडून ती पळून गेली. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

हे प्रकरण जनपदच्या जगदीशपूर पोलीस स्टेशन परिसरातील मगलगंज कचनाव गावातील असल्याची माहिती आहे. या गावाचा अन्सार अली नावाच्या तरुणाची दोन लग्न झाली होती. दोन बायका असल्याकारणाने घरात सतत वाद होत होते. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही बायकांमधील वाद टोकाला पोहचत होते. 

अन्सारच्या दुसऱ्या पत्नीचं नाव नाजनी असून ती तिच्या पतीला सतत समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तो त्याच्या पत्नीचं काहीच ऐकत नव्हता. अखेर नाजनी तिच्या पतीला वैतागली आणि संतापून त्याच्या पत्नीवर हल्ला केला. म्हणून आज तिने प्रथम तिच्या पतीला शामक औषध दिले. त्यानंतर नाजनीने तिच्या पतीचा गुप्तांग कापला. तिने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले आणि ती घटनास्थळावरून पळून गेली.

हे ही वाचा: Govt Job: आता सरकारी बँकेत नोकरी मिळणं सोप्पं... 'या' बँकांमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरती!

पीडित तरुणाला रुग्णालयात दाखल 

अशा पद्धतीने हल्ला केल्यानंतर पतीची अवस्था गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर पीडित तरुणाला त्वरीत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, प्राथमिक उपचारानंतर त्याला रायबरेली एम्समध्ये रेफर करण्यात आलं आहे. अन्सार अलीच्या भावाने प्रकरणाची माहिती देताना सांगितलं, "जेव्हा आम्ही घराजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला नाझनी पळून जाताना दिसली. त्यानंतर आतमध्ये आम्हाला भावाचा शरीर रक्ताच्या थारोळ्यात दिसलं. हे दृश्य पाहिल्यानंतर आम्हाला सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि आम्ही लगेच त्याला घेऊन रुग्णालयात गेलो." 

हे ही वाचा: आधी पत्नीचा गळा दाबला अन् नंतर झोपलेल्या मुलींना सुद्धा... अनैतिक संबंधाच्या संशयातून होत्याचं नव्हतं झालं

पोलीस घटनास्थळी दाखल 

अन्सार अलीच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, हल्ल्यात त्याच्या भावाचं गुप्तांग कापण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अधिकारी म्हणाले,  "माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले असून तक्रार पत्राच्या आधारे कारवाई केली जाईल." या घटनेची चौकशी सुरू असून दोन्ही पत्नींमधील वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp