आधी पत्नीचा गळा दाबला अन् नंतर झोपलेल्या मुलींना सुद्धा... अनैतिक संबंधाच्या संशयातून होत्याचं नव्हतं झालं

दिल्लीच्या करावल नगर परिसरात एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलींची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटना घडल्याच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

आधी पत्नीचा गळा दाबला अन् नंतर झोपलेल्या मुलींना सुद्धा...
आधी पत्नीचा गळा दाबला अन् नंतर झोपलेल्या मुलींना सुद्धा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून केली पत्नीची हत्या

point

मुलींचा देखील गळा दाबून निर्घृणपणे हत्या..

Crime News: दिल्लीच्या करावल नगर परिसरात एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलींची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटना घडल्याच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीच्या चारित्र्यावरील संशय हेच हत्येमागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आरोपीची पुढील चौकशी करत असल्याची माहिती आहे. 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय 

मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय आरोपी करावल नगरमधील शहीद भगत सिंह कॉलनीमध्ये राहत असून त्याचं नाव प्रदीप आहे. त्याची पत्नी जयश्री, 8 वर्षीय मुलगी अंशिका आणि 5 वर्षीय मुलगी इशिका यांच्यासोबत तो राहत होता. प्रदीपला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. एके दिवशी, वाद टोकाला पोहचल्याने जयश्री घर सोडून पळून गेली होती मात्र, कुटुंबियांनी समजावल्यानंतर ती परत तिच्या घरी आली. 

पत्नी आणि मुलींचा गळा दाबून हत्या 

शुक्रवारच्या रात्री प्रदीप कामाहून घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीसोबत त्याचा वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपी पतीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने झोपलेल्या मुलींचा देखील गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली. घटनेनंतर दरवाजा बंद करुन प्रदीप त्याच्या घरातून पळून गेला. 

हे ही वाचा: दोन वेळा लग्नासाठी विकलं अन् खोटं ओळखपत्र... दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेचा अखेर शोध...

माहेरच्या लोकांनी केला आरोप 

रक्षाबंधनाचा सण असल्याकारणाने बरेच नातेवाईक आरोपीच्या घरी गेले होते. सकाळी 7 वाजताच्या सुमारास पीडित महिलेच्या सासूने सूनेच्या खोलीत पाहिलं असता जयश्री आणि तिच्या दोन्ही मुली अंथरुणावर मृतावस्थेत पडलेल्या आढळलं. हे दृश्य पाहून तिला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर पीसीआरच्या माध्यमातून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये जयश्रीचं प्रदीपसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर आरोपी पती सतत तिच्या पत्नीला मारहाण करत असल्याचं देखील सांगण्यात आलं. तीन भावांची एकूलती एक बहीण असलेल्या जयश्रीच्या हत्येनंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी प्रदीप आणि त्याच्या भावावर हत्येचा आरोप केला आहे. 

हे ही वाचा: रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिक पिशव्या, उघडून पाहिलं तर तुकड्यांमध्ये... पोलीस पोहचले अन् धक्कादायक खुलासा

डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता सीसीटीव्ही आणि टेक्निकल तपासाच्या आधारे आरोपी पतीला मुकुंद विहार येथून अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp