दोन वेळा लग्नासाठी विकलं अन् खोटं ओळखपत्र... दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेचा अखेर शोध...

पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरातून दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित मुलगी ही राजस्थानच्या पालीमध्ये पोलिसांना सापडली.

दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेचा अखेर शोध...
दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेचा अखेर शोध...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीचं अपहरण अन् दोन वेळा लग्नासाठी विकलं...

point

दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेचा अखेर शोध लागला

Crime news: अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचाराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरातून दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित मुलगी ही राजस्थानच्या पालीमध्ये पोलिसांना सापडली. याप्रकरणी सीबीआयने (CBI) ने एक महिलेसह पाच लोकांना अटक केली आहे. संबंधित मुलीला लग्नासाठी दोन वेळा विकण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. 

दोन वेळा लग्नासाठी विकलं...

शनिवारी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आणि भरत कुमार, जगदीश कुमार, मीना दपुबेन, रता राम आणि दिलीप कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची ओळख असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी पीडितेला दोन वेळा लग्नासाठी विकलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने 16 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल केला होता. 

ट्यूशन क्लासला गेल्यानंतर बेपत्ता

पीडित मुलगी 9 ऑगस्ट 2023 रोजी ट्यूशन क्लासला गेल्यानंतर तिथूनच बेपत्ता झाली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. पीडितेचा तपास करताना गुन्हेगारी हेतूने मुलीचं अपहरण करण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आला. सुरुवातीला स्थानिक पोलीस प्रशसानाने या घटनेचा तपास केला आणि त्यानंतर पश्चिम बंगाल सीआयडीने हे प्रकरण हाती घेतलं. 

पीडितेच्या आईने कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण कोलकातामधील सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखा (SCB) कडे सोपवण्यात आलं. 

हे ही वाचा: रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिक पिशव्या, उघडून पाहिलं तर तुकड्यांमध्ये... पोलीस पोहचले अन् धक्कादायक खुलासा

सीबीआयने घेतला शोध 

सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) च्या साहाय्याने सीबीआयला राजस्थानमधील पाली येथे पीडित मुलीला नेण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर सीबीआयची एक टीम पाली येथे पोहोचली आणि मिळालेल्या माहिती पुष्टी केल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी पीडितेला आरोपीच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. 

प्रौढ घोषित करण्यात आलं..

सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन असताना पीडित मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र, तिच्या लग्नासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तिला खोट्या पद्धतीने प्रौढ घोषित करण्यात आलं होतं. संबंधित मुलीला लग्नासाठी दोन वेळी विकण्यात आल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण एका मोठ्या मानवी तस्करी प्रकरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

हे ही वाचा: शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने लक्ष्मी-नारायण राजयोगाची निर्मिती, काही राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

प्रकरणातील सर्व आरोपींना पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शनच्या न्यायालयिन मेजिस्ट्रेट समोर सादर करण्यात आलं. तसेच, पुढील तपासासाठी सीबीआयने तीन दिवसांची ट्रान्झिट रिमान्ड प्राप्त केली असल्याची देखील माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp