Nashik Viral Story: नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात रक्षाबंधनाच्या दिवशीच मन हेलावून टाकणारी घटना घडली. सणाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी इतर बहिणी आपल्या भावांच्या हातांवर राखी बांधून सण साजरा करत होत्या, त्याच वेळी एक 9 वर्षांची मुलगी तिच्या 3 वर्षांच्या मृत भावाच्या हातावर राखी बांधत होती. भावाचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? सविस्तर माहिती जाणून घ्या.
ADVERTISEMENT
बिबट्या आयुषला घेऊन गेला..
खरंतर, ही घटना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या रात्री घडली. गावातील भगत कुटुंबातील 3 वर्षांचा मुलगा आयुष भगत त्याच्या घरासमोर खेळत होता, तेव्हा अचानक एक बिबट्या आला आणि त्याच्यावर झडप घालून त्याला घेऊन गेला. आयुष अचानक घरासमोरुन गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, काही वेळानंतर घराजवळील परिसरातच आयुषचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच छळबळ माजली.
हे ही वाचा: एकाच नवऱ्याच्या दोन बायका! पतीला दिलं नशेचं औषध अन् प्रायव्हेट पार्टच... संतापलेल्या पत्नीने केलं असं काही...
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ गेल्याचं दु:ख
दुसऱ्या दिवशीच म्हणजे शनिवारी रक्षाबंधनाचा सण होता. याच दिवशी आपल्या भावाला राखी बांधण्याच्या आनंदात असलेली आयुषची बहीण मात्र, त्या दिवशी भावाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे हुंदका फोडून रडत होती. मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यावेळी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. लोक मुलाचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असताना राखी बांधण्याची वेळ झाली होती.
हे ही वाचा: Govt Job: आता सरकारी बँकेत नोकरी मिळणं सोप्पं... 'या' बँकांमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरती!
भगत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
लहान भाऊ जाण्याच्या दु:खात आयुषची 9 वर्षांची बहीण खूप रडत होती आणि तिच्या भावाला शेवटचं डोळे भरुन पाहत होती. हे हृदयद्रावक दृश्य पाहून गावकरीही आपले अश्रू रोखू शकले नाहीत. अंत्यसंस्कारापूर्वी आयुषच्या बहिणीने तिच्या मृत भावाच्या हातावर राखी बांधली आणि त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. या घटनेमुळे भगत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
ADVERTISEMENT
