Today Shocking Viral News : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक धक्कादायक उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका तरुणावर आरोप करण्यात आला आहे की, त्याने शेजारी राहणाऱ्या तरुणी आणि तिच्या वहिनीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो त्यांना ब्लॅकमेल करू लागला. याचदरम्यान त्याने दोघींसोबत घाणेरडं कृत्य केलं. हे प्रकरण खूप दिवसांपर्यंत सुरु राहिलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची शेजारी राहणाऱ्या मुलीवर वाईट नजर होती. तो नेहमी त्यांच्या घरी येजा करायचा. एक दिवस त्याने तरुणी आणि तिच्या वहिनीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तरुणाने दोघींना ब्लॅकमेल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
महिलांना ब्लॅकमेल करून अनेकदा केलं वाईट कृत्य
तरुणाने शेजारची मुलगी आणि तिच्या वहिनीसोबत अनेकदार वाईट कृत्य केलं, असा आरोप आहे. तसच कोणाला सांगितलं, तर जीवे मारण्यात येईल, अशी धमकीही त्याने महिलांना दिली. दोघीही बदनामीच्या भीतीमुळे मजबूर झाल्या अन् त्याचं म्हणणं ऐकत राहिल्या. काही दिवसांपर्यंत आरोपीचं हे कृत्य सुरुच होतं.
हे ही वाचा >> पैसा-पाणी: स्वस्त रशियन तेलाचा फायदा कोणाला मिळाला?
रिपोर्टनुसार, आरोपीने पहिल्यांदा 2 मे 2025 च्या रात्री शेजारची मुलगी आणि त्या वहिनीला छतावर बोलावलं होतं. त्यानंतर त्याने दोघींना अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर त्याने दोघींना ब्लॅकमेल करून त्यांच्यासोबत वाईट कृत्य केलं. पण एक दिवस आरोपीला एक चूक नडली. तो घरात घुसल्यावर इतर लोकांनी त्याला पाहिलं. त्यानंतर आरडाओरडा झाल्यावर तो घरातून पळून गेला.
पोलिसांनी असा पकडला आरोपीला
महिलांसोबत नको ते करण्यासाठी एक दिवस आरोपी त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर महिलांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून घरातील इतर लोक जागे झाले आणि आरोपीला ओळखलं. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांना कळवण्यात आलं. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT











