"मीच माझ्या बायकोला..." पतीने केला 'तो' एक कॉल अन् पोलीस सुद्धा हादरले, नेमकं काय घडलं?

राजस्थानमधील कोटपूतली जिल्ह्यात एका व्यक्तीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली असून स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पतीने केला 'तो' एक कॉल अन् पोलीस सुद्धा हादरले

पतीने केला 'तो' एक कॉल अन् पोलीस सुद्धा हादरले

मुंबई तक

• 11:59 AM • 12 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीने केला पोलिसांना फोन अन् दिली माहिती

point

नवरा बायकोचा वाद टोकाला पोहचला आणि रागाच्या भरात...

Murder case: राजस्थानमधील कोटपूतली जिल्ह्यातील नीमरानाच्या गंडाला गावात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली असून स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

हे वाचलं का?

पोलिसांना फोन करुन दिली माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गंडाला गावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकरणातीस आरोपी पतीचा काही कारणावरुन पीडित पत्नीसोबत वाद झाला. मात्र, हा वाद टोकाला पोहचला आणि रागाच्या भरात आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केली. आरोपीने पीडितेचा गळा दाबला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. आश्चर्याची बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा: आधी डोकं धडापासून वेगळं केलं, नंतर मृतदेहाचे 19 तुकडे अन्... जावयानेच केली सासूची निर्घृण हत्या

दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद   

आरोपीने पोलिसांना फोन केला आणि स्वत: पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं. या माहितीनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्याची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि तो नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक तापासवरुन, पती आणि पत्नीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होते आणि याच कारणावरुन पत्नीची हत्या झाल्याचं समोर आलं. 

हे ही वाचा: 'दहीहंडी'चा सराव जीवघेणा ठरला! 11 वर्षीय गोविंदा थरावर चढला, पण तोल गेला अन्... मुंबईतील दुर्दैवी घटना

पोलिसांचा तपास 

पोलीस या प्रकरणाचा खोल तपास करत असून हत्येमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, हत्या पूर्वनियोजित होती की रागाच्या भरात झाली, याचा देखील पोलीस तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीच्या चौकशीत पोलिसांनी ठोस पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, स्थानिकांच्या मते, पूर्वी सुद्धा आरोपी पती आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. या घटनेने सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसला आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करत आहेत.

    follow whatsapp