आधी डोकं धडापासून वेगळं केलं, नंतर मृतदेहाचे 19 तुकडे अन्... जावयानेच केली सासूची निर्घृण हत्या
काही दिवसांपूर्वी, रस्त्याच्या कडेला कित्येक प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची बातमी समोर आली होती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास केला असता थक्क करणारे खुलासे करण्यात आले आहेत.

बातम्या हायलाइट

जावयाने केली सासूची निर्घृण हत्या

हत्येनंतर मृतदेहाचे 19 तुकडे केले अन् पिशव्यांमध्ये भरुन...
Crime news: तुमकुरु जिल्ह्यातील कोरतगेरे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. काही दिवसांपूर्वी, रस्त्याच्या कडेला कित्येक प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची बातमी समोर आली होती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास केला असता थक्क करणारे खुलासे करण्यात आले आहेत. हा मृतदेह 42 वर्षीय लक्ष्मी देवीचा असून त्याचे अतिशय क्रूरपणे तुकडे करून फेकून देण्यात आल्याचं तपासात समोर आलं.
कसा झाला घटनेचा उलगडा?
7 ऑगस्टच्या सकाळी कोलाला गावाजवळ काही लोक रस्त्याच्या बाजूने जात असताना त्यांना तिथे बऱ्याच प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसल्या. लोकांना त्या ठिकाणी संशयास्पद वाटलं असता त्यांनी त्या पिशव्या उघडल्या आणि त्यात मानवी शरीराचे तुकडे आढळून आले. त्यानंतर, पोलिसांनी तातडीने माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर तपास सुरू केला. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांनी आणखी सात पिशव्या ताब्यात घेतल्या, ज्यामध्ये महिलेच्या शरीराचे उर्वरित भाग आणि डोकं सापडलं.
शरीराचे 19 तुकडे
तपासात सापडलेल्या डोक्याच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि मृत महिलेचं नाव लक्ष्मी देवी असल्याचं समोर आलं. संबंधित महिलेची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिचा मृतदेहाचे 19 तुकडे करुन ते फेकून देण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा: 'दहीहंडी'चा सराव जीवघेणा ठरला! 11 वर्षीय गोविंदा थरावर चढला, पण तोल गेला अन्... मुंबईतील दुर्दैवी घटना
या हत्येचं प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक सज्ज करण्यात आलं. तपासाच्या काही दिवसांनंतर पोलिसांनी प्रकरणातील तीन आरोपींना अटक केल्याचं समोर आलं. या प्रकरणातील आरोपी लक्ष्मी देवीचा जावई डॉ. रामचंद्रप्पा एस आणि त्याचे दोन साथीदार के. एन. और किरण के. एस असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.
हे ही वाचा: 'माझे घर धोक्यात... ते वाचवा', अभिनेता किशोर कदमांची 'ती' Facebook पोस्ट प्रचंड Viral
हत्येमागचं नेमकं कारण काय?
पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता मोठा खुलासा करण्यात आला. प्रकरणातील आरोपी म्हणजेच मृत महिलेचा जावई रामचंद्रप्पाला त्याच्या सासूच्या चारित्र्यावर संशय होता. सासूच्या कारनाम्यांमुळे आपल्या प्रतिष्ठेला डाग लागत असल्याचं आरोपीला वाटलं. याच संशयामुळे रागात त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून आपल्या सासूच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आल्या.