किन्नर काजलचे होते 'त्या' तिघांसोबत संबंध? मुलगी दिसण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी, घटनेचं पुणे कनेक्शन काय?
crime news : किन्नर काजलबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. काजलचा प्रियकर आलोक तसेच आकाश आणि हेमराजविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काजलबद्दल अनेक धक्कादायक खुलासे
काजलचा प्रियकर आलोक
बॉयफ्रेंडविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये काजल किन्नर आणि तिच्या भावाचा मृतदेह सापडला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मा्र, अद्यापही घटनेची एकूण माहिती समोर आली नाही. आता काजलबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. काजलचा प्रियकर आलोक तसेच आकाश आणि हेमराजविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : गल्ली ते दिल्लीत राडा, 300 हून अधिक खासदार सामील, महिला रणरागिणी खासदार भिडल्या, अखिलेश यादवांनी केला कहर
काजल किन्नरच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. खरंतर, काजल आणि तिच्या भावाचा मृतदेह हा सुरक्षित स्वरुपात ठेवण्यात आले आहेत, याचा तपास केला जाईल. सांगण्यात येतंय की, काजलच्या ज्या 3 मैत्रिणी होत्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या फरार आहेत. सांगण्यात येतंय की, संबंधित तिघांचेही काजल किन्नरशी प्रेमसंबंध होते.
मुंबईतील रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी
काजलबाबत सांगण्यात येतंय की, जर तिला कोणी किन्नर म्हणालेलं तिला आवडत नव्हतं. काजलने 5 महिन्यांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी केली होती. तसेच यासाठी तब्बल 3-4 लाख रुपये एवढा खर्च झाला. काजलने आपली मूळ ओळख लपवून ती स्वत: मुलीचीच ओळख सांगायची. तिने अनेक ठिकाणी डान्स स्पर्धेतही प्रवेश घेतला होता.
दरम्यान, सीसीटीव्ही पाहिल्यानंतर देवेंद्र चौधरी म्हणाले की, काजलच्या आईच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण, ते तिघेही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. 4 ऑगस्टच्या सायंकाळी तिनं बाजारातून भाजी आणली आणि त्यानंतर ती घरी गेली. त्यानंतर ती पुन्हा घरातून कधीच बाहेर आली नाही.










