सख्खा भाऊ पक्का वैरी! पुण्यातून घरी आला..राखी बांधल्यानंतर बहिणीचा खून केला, तिच्या प्रियकरालाही संपवलं!

Shocking Double Murder Case : उत्तरप्रदेशच्या झांसी येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणामुळे येथील एका कपलची हत्या करण्यात आली आहे.

Extra Marital Affair Shocking Viral News
Extra Marital Affair Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुप्पो आणि विशाल एकमेकांवर प्रेम करायचे अन्..

point

पुण्याहून भाऊ घरी आला आणि दोघांना मारलं

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Shocking Double Murder Case : उत्तरप्रदेशच्या झांसी येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणामुळे येथील एका कपलची हत्या करण्यात आली आहे. 24 तासांआधी प्रियकराचा मृतदेह सापडला. त्यानंतर 40 किमी अंतरावर प्रेयसीचा मृतदेह आढळल्याने सर्वांना मोठा धक्का बसला.

तरुणीचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते. हत्येचा आरोप तरुणीच्या भावावर लावण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तरुणीच्या भावाने आधी बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, असा आरोप आहे. त्यानंतर त्याने रक्षाबंधनाला बहिणीला राखी बांधली आणि तिला बाहेर नेऊन तिची हत्या केली. 

पुप्पो आणि विशाल एकमेकांवर प्रेम करायचे अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, झांसी जिल्ह्यातील गरौठा पोलीस ठाण्याच्या परिसरातील चंद्रपुरा गावात पुप्पो आणि टहरौली येथील पसराई गावात विशाल राहायचा. त्या दोघांचही अफेअर सुरु होतं. दोघांमध्ये एक वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही लग्न करायचं होतं. पण तरुणीच्या भावाचा या नात्याला विरोध होता. जानेवरी-फ्रेब्रुवारी महिन्यात दोघे घरातून पळूनही गेले होते, असं सांगितलं जातंय. पण पोलिसांनी त्यांना शोधलं होतं. त्यानंतर दोघांना आपापल्या घरी पाठवण्यात आलं होतं. पण ते दोघे पुन्हा संपर्कात आले.

हे ही वाचा >> गल्ली ते दिल्लीत राडा, 300 हून अधिक खासदार सामील, महिला रणरागिणी खासदार भिडल्या, अखिलेश यादवांनी केला कहर

पुण्याहून भाऊ घरी आला आणि दोघांना मारलं

पोलिसांनी म्हटलंय की, घरी गेल्यावर दोघांमध्ये बोलणं होत होतं. पण तरुणीचा भाऊ अरविंदला त्यांचं बोलणं आवडलं नाही. 7 ऑगस्टला तो पुण्याहून घरी आला होता. त्यानंतर तो त्याचा सहकारी प्रकाश प्रजापतीसोबत प्रियकराच्या घरी पोहोचला. त्याने विशालला भरोस दिला की, तो दिल्लीत त्याला नोकरी मिळवून देईल. विशालने त्याचं म्हणणं ऐकलं. आरोपी अरविंद आणि त्याचा सहकारी विशालला बाहेर घेऊन गेला आणि त्याची हत्या केली.

हे ही वाचा >> ग्राहकांनो! आज तर तुमची मज्जाच मज्जा..सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, 24 कॅरेटचे भाव वाचून उड्याच माराल

विशालचा मृतदेह झाडीत 9 ऑगस्टला मिळाला. दुसरीकडे, रक्षाबंधनासाठी आरोपी भावाने बहिणीला राखी बांधली. त्यानंतर औषधे घेण्याचा बहाणा करून त्याने तिला बाहेर नेलं आणि तिची हत्या करून तो फरार झाला. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp