अफेअरमुळे भाजप नेत्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नीचा रस्त्यातच केला खून! पोलिसांनी खाकीचा दणका दाखवला अन्..

Husband Killed Wife Crime News :  अजमेरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एका महिलेची गळा कापून हत्या करण्यात आली होती. महिलेनं तिच्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याला आशीर्वाद दिला अन् ती घरत परतत होती.

Today Shocking Murder Case
Today Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चोरट्यांनी हल्ला केला, नेत्यानं सांगितला थरार

point

पतीने केला पत्नीच्या हत्येचा प्लॅन

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Husband Killed Wife Crime News :  अजमेरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एका महिलेची गळा कापून हत्या करण्यात आली होती. महिलेनं तिच्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याला आशीर्वाद दिला अन् ती घरत परतत होती. महिला पतीसोबत बिंधास्तपणे घरी येत होती. पण रस्त्यातच तिचा मृत्यू होईल, याची जराही कल्पना तिला नसावी. त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या.

भाजप सिलोरा विभागाचे नेते रोहित सैनी यांची पत्नी संजू सैनी गंभीर जखमी झाली अन् त्यांनी किशनगढच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केलं. रोहितही जखमी झालेला असतो. याप्रकरणी पोलीस तपास सुरु होतो आणि चोरीच्या घटनेचा पर्दाफाश होतो.

चोरट्यांनी हल्ला केला, नेत्यानं सांगितला थरार

भाजप नेते रोहित सैनी यांनी पोलिसांना सांगितलं की, ते रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नीला घेऊन माहेर जात होते. भावाला राखी बांधल्यानंतर पत्नी संजू त्यांच्यासोबत घरी परतत होती. रस्त्यात चोरट्यांनी हल्ला केला आणि पत्नीचा गळा कापला. पत्नीचा मृत्यू झाला अन् मला (रोहित) जखमा झाल्या.

हे ही वाचा >> श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..

हल्ला झाल्यानंतर मलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास केला असता सत्य उघडकीस आलं. तपासात उघडकीस आलं की, रोहितचं पत्नी संजूसोबत जमत नव्हतं. संजूला तो पसंत करत नव्हता. त्याची दुसऱ्या महिलेसोबत मैत्री वाढली होती. त्यामुळे पत्नीचं टेन्शन वाढलं होतं.

पतीने केला पत्नीच्या हत्येचा प्लॅन

रोहित सैनीने त्याच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या पत्नीचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. दोन मित्रांच्या मदतीनं त्याने कट रचला. डेट आणि लोकेशन फिक्त झालं. प्लॅननुसार रोहित पत्नी संजूला घेऊन माहेरी गेला. भावाला राखी बांधल्यानंतर पत्नी रोहितसोबत घरी परतत होती. पण रस्त्यातच तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि रोहितला किरकोळ मारहाण करत त्याचे मित्र फरार झाले. रोहित मृत पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला आणि त्याने या प्रकरणाला चोरीचं वळण लावलं. पण पोलिसांनी या घटनेमागचं सत्य उघडकीस आणलं. 

हे ही वाचा >> मुंबई हादरली! मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षांच्या मुलीवर 200 जणांनी केलं वाईट कृत्य, भयंकर घटना

हे वाचलं का?

    follow whatsapp