विवाहित महिलेचे होते बाहेरच्या पुरूषासोबत संबंध, स्वत:च्या 5 महिन्यांच्या मुलीलाच संपवलं

मुंबई तक

Today Shocking Viral News :  त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. येथील सोनामुरा परिसरात हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं पोटच्या लेकीचा केला खून

point

हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

point

हत्येमागंच नेमकं कारण काय?

Today Shocking Viral News :  त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. येथील सोनामुरा परिसरात हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पाच महिन्यांच्या मुलीची तिच्या आईने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलीय. सुचित्रा देबबर्मा असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. 

हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

सोनमुरा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, मृत मुलीच्या काकांनी तक्रार दाखल केल्यानंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपी महिलेला अटक केली आहे. जेव्हा आरोपी महिलेचा पती अमित देबबर्मा घरातून बाहेर गेला होता, तेव्हा मुलीची हत्या करण्यात आली. 

हे ही वाचा >> गल्ली ते दिल्लीत राडा, 300 हून अधिक खासदार सामील, महिला रणरागिणी खासदार भिडल्या, अखिलेश यादवांनी केला कहर

हत्येमागचं नेमकं कारण काय?

घटनेची माहिती मिळताच पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना बेडवर मुलीचा मृतदेह असल्याचं आढळलं. त्यानंतर मृतदेह सोनमुरा येथील रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. मुलीच्या मृत्यूमागचं कारण तपासण्यात येत आहे. जर या घटनेत आणखी कोणाचा सहभाग असल्यास, त्या आरोपीवरही कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

अशाच प्रकारची एक घटना मागील काही दिवसांमध्ये दिल्लीच्या पटेल नगरमध्ये घडली होती. एका मोलकरणीने तिच्या घरमालकाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली होती. पीटीआय रिपोर्टनुसार, 2023 आरोपी रोशनी मोलकरणीचं काम करत होती. तिने मालकाच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या डब्यात टाकून फेकून दिला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp