पीडितेचे बनवले अश्लील व्हिडिओ अन् तिच्या नवऱ्याला पाठवले, नंतर तिच्या सासरी जाऊन...

crime news : देशभरात अनैतिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. एका व्यक्तीने महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून पीडितेच्या पतीला पाठवला. त्यानंतर घटस्फोटासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता.

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ

point

महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला

point

नेमकं काय घडलं?

Crime News : देशभरात अनैतिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. एका व्यक्तीने महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून पीडितेच्या पतीला पाठवला. त्यानंतर घटस्फोटासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे.

हे ही वाचा : श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..

नेमकं काय घडलं? 

पीडित महिला हरदोईच्या बलेहरा येथील रहिवासी आहे. तक्रारीत म्हटले की, ती संतोष कुमार नावाच्या व्यक्तीच्या घरी मार्च 2025 पर्यंत ती काम करत होती. मुलीच्या म्हणण्यांनुसार, संतोष तिला अनेकदा गावी जाण्यापासून रोखायचा. काहीबाही सांगून तिला आपल्या घरीच थांबवण्याचा प्रयत्न करायचा.

मुलीचे म्हणणे आहे की, 13 मार्च 2023 रोजी संतोषने शिवम नावाच्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले होते, परंतु नंतर त्याने तिला सासरी जाऊ दिले नाही. काही काळानंतर, जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी गेली तेव्हा संतोषने तिचे सामान, रोख रक्कम, दागिने, कागदपत्र, मोबाईल आणि एटीएम कार्ड  स्वत:कडेच ठेवले.

पीडितेला मारहाण केल्याचा आरोप

25 मार्च रोजी संतोषने पीडितेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित महिला तिच्या सासरच्या घरी गेली. त्यानंतर संतोषने तिला  बर्बाद करेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवला, पण त्या भोळ्याभाबड्या पीडितेला याबाबत काहीच माहिती नव्हतं. काही दिवसानंतर एका अनोळखी नंबरवरून तिच्या पतीच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ आणि एक फोटो पाठवण्यात आले.

हे ही वाचा : मुंबई हादरली! मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षांच्या मुलीवर 200 जणांनी केलं वाईट कृत्य, भयंकर घटना

संबंधित प्रकरणात पीडित महिलेचा आरोप आहे की, 2 जून रोजी संतोष तिच्या सासरच्या घरी आला आणि तिला तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी धमकावू लागला. पीडितेनं आरोपीच्या भावाला सांगितलं की, त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp