Ajit Pawar: पवार कुटुंबियांनी घेतलं अजितदादांचं शेवटचं दर्शन, राजकीय नेत्यांची उपस्थिती...
मुंबई तक
• 12:06 PM • 29 Jan 2026
काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत.
ADVERTISEMENT

1/8
काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत.

2/8
त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले आहेत. दादांची अंत्ययात्रा निघताच कार्यकर्त्यांनी फोडला हंबरडा असून "अजित दादा अमर रहे", अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
ADVERTISEMENT

3/8
तसेच, लाडक्या दादांच्या जाण्याने लाडक्या बहिणी सुद्धा भावूक झाल्या असून "अजितदादा, परत या" असा त्यांनी टाहो फोडला.

4/8
अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधींना सुरूवात झाल्यानंतर अजितदादांवरील तिरंगा जय पवारांना सोपवण्यात आला. तसेच, युगेंद्र पवार, रोहित पवार मंचावर देखील आले.
ADVERTISEMENT

5/8
अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील नेतेमंडळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय.

6/8
सुनेत्रा पवारांसह कुटुंबियांनी मंचावर येऊन अजितदादांचं शेवटचं दर्शन घेतलं. दरम्यान, शरद पवार देखील भावूक झाल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT

7/8
अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी अमित शाह विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नंतर, त्यांनी मंचावर येऊन अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

8/8
त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून दादांना श्रद्धांजली वाहिली.
ADVERTISEMENT










