पुणे: पुण्यातील खाराडी-वाघोली परिसरात रस्त्यावरील एका मादी श्वानावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांकडून सांभाळल्या जाणाऱ्या फॉक्सी या मादी श्वानाला 9 डिसेंबर रोजी सकाळी भयंकर रक्तस्राव होत असल्याचं आढळून आलं.
ADVERTISEMENT
कर्मण्ये फाउंडेशनच्या टीना मल्कानी, ज्या फॉक्सीला दररोज अन्न देतात, यांनी तिला तातडीने आपत्कालीन पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.
नेमकी घटना काय?
पशुवैद्यकीय तपासणीतून असे स्पष्ट झाले की, तिच्या जखमा बहुधा अज्ञात व्यक्तीने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे झाल्या आहेत. तिच्या योनी भागाभोवती जखमा व निळसर डाग आढळून आले असून, हे मानवी व्यक्तीने एखादी वस्तू घातल्यामुळे किंवा वापरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. झालेल्या गंभीर आघातामुळे मादी श्वानाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून योनीमार्गातून तसेच उलट्यांमधूनही रक्तस्राव झाला आहे.
हे ही वाचा>> ट्रेनच्या शौचालयात तरुणी आत शिरली, जणू काही OYO हॉटेलच... सगळा खेळ कॅमेऱ्यात कैद
अमानवी कृत्याने पुणेकरांना बसला धक्का
“हे केवळ क्रौर्य नाही, तर हा एक गंभीर गुन्हा आहे,” असे टीना मल्कानी यांनी सांगितले. “समुदायातील प्राणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात, आणि अशा घटना अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या आहेत. असे कृत्य करणारी व्यक्ती केवळ प्राण्यांसाठीच नव्हे तर मानवांसाठीही, विशेषतः महिला आणि मुलांसाठी गंभीर धोका आहेत. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. पुढचा बळी कोणीही असू शकतो!"
हे ही वाचा>> मोलकरणीवर मालकाचा लैंगिक अत्याचार! शेवटी, पत्नीसोबत मिळून निर्घृण हत्या, सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह
दरम्यान, या प्रकरणी टीना मल्कानी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











