Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगरात घडलेल्या एका निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सोमवारी, 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह तिच्याच घरात आढळून आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनास्थळी सापडलेल्या एका छोट्या धाग्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून या खुनाचा छडा लावला आहे.
ADVERTISEMENT
मोहाडी येथील दंडवाले बाबा नगर परिसरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या 75 वर्षीय लीलाबाई हिरामण सूर्यवंशी या एकट्याच राहत होत्या. पहाटे त्यांच्या घरातून रक्त बाहेर आल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लीलाबाई यांचा मृतदेह घरातच आढळून आला. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून वृद्धेवर अमानुष हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. घरातील काही साहित्य, स्वयंपाकघरातील डबे आणि गॅस सिलेंडर गायब असल्याचेही निदर्शनास आले.
हेही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीला कोयता अन् चाकूने 22 वार करुन संपवलं, आरोपीला जन्मठेप
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून तपासाला गती देण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ सापडले. हे घड्याळ तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्याचा फोटो परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आला.
याच घड्याळाच्या आधारे एका बातमीदाराने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यावरून सागर राजू कोळी (वय 25, रा. वाल्मिकी आंबेडकर वसाहत, मोहाडी) याच्यावर संशय बळावला. मात्र तो आपल्या घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी सापडत नव्हता. पुढील तपासात तो महेबूब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याला तेथून ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, चोरीच्या उद्देशाने तो रात्री लीलाबाई सूर्यवंशी यांच्या घरात शिरला होता. गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढताना झालेल्या आवाजामुळे वृद्ध महिला जाग्या झाल्या. त्यांनी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. स्टीलच्या खुरपीसारख्या कठोर वस्तूने गुप्तांगावर वार करून त्याने त्यांची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. या संपूर्ण कारवाईत अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, पोलिसांकडून मोठ्या हालचाली, कोणत्याही क्षणी अटक होणार
ADVERTISEMENT











