सोलापूर : थंड पेयात औषध मिसळून 13 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय नराधमाकडून बलात्कार, मुलगी अत्याचारातून आई झाली

Solapur Crime : या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षींमुळे आरोपीविरोधातील आरोप ठोसपणे सिद्ध झाले. सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील प्रकाश जन्नू आणि शीतल डोके यांनी प्रभावीपणे मांडली.

 Solapur Crime

Solapur Crime

मुंबई तक

17 Dec 2025 (अपडेटेड: 17 Dec 2025, 11:15 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : थंड पेयात औषध मिसळून 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

point

पीडित मुलगी अत्याचारातून आई झाली

Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील एका गंभीर आणि धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. अल्पवयीन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांबाबत न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.

हे वाचलं का?

मनोहरनगर झोपडपट्टी परिसरात राहणारा विकास दिगंबर शिंदे (वय 50) याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत खाऊसाठी पैसे देतो, अशी बतावणी करत तिच्याशी जवळीक साधली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने वेगवेगळ्या वेळेला पीडितेवर अत्याचार केला. एका प्रसंगी आरोपीने मुलीच्या थंड पेयात काही औषध मिसळून ते पाजले. पेय घेतल्यानंतर मुलीला चक्कर येऊन ती बेशुद्ध अवस्थेत पडली. त्याच अवस्थेचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेची माहिती कुणालाही दिल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. भीतीमुळे आणि अल्पवयीन असल्याने पीडिता दीर्घकाळ शांत राहिली. मात्र काही काळानंतर तिच्या प्रकृतीत झालेल्या बदलांमुळे कुटुंबीयांच्या लक्षात प्रकार आला. पुढे पीडितेला बाळाचा जन्म झाला, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात खळबळ उडाली.

पीडितेच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान पीडितेची सविस्तर साक्ष, वैद्यकीय अहवाल तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे डीएनए अहवाल ठरला. पीडितेला झालेल्या बाळाचा जैविक जनक आरोपी विकास शिंदेच असल्याचे डीएनए तपासणीत स्पष्ट झाले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षींमुळे आरोपीविरोधातील आरोप ठोसपणे सिद्ध झाले. सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील प्रकाश जन्नू आणि शीतल डोके यांनी प्रभावीपणे मांडली.

सर्व पुरावे आणि साक्षी लक्षात घेत जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम 376 सह संबंधित तरतुदींनुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास 2 महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीच्या घोषणेसाठी तारीख निश्चित; संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय

 

 

 

 

    follow whatsapp