जळगावात 9 वर्षांची मुलगी शाळेत गेली, सायंकाळी घरीच आली नाही, 'त्या' ठिकाणी दप्तर सापडलं

Jalgaon crime : जळगावातील चाळीसगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव धनश्री शिंदे असे आहे.

Jalgaon crime

Jalgaon crime

मुंबई तक

16 Dec 2025 (अपडेटेड: 16 Dec 2025, 03:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जळगावातील चाळीसगावात एक धक्कादायक घटना

point

आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर...

point

धक्कादायक प्रकरण समोर

Jalgaon crime : जळगावातील चाळीसगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव धनश्री शिंदे असे आहे. ती मुलगी इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. चिमुकली बेपत्ता होऊन 3 दिवस होऊन गेले होते. ती अद्यापही सापडत नसल्याने तिच्या अपहरणाचा संशय अधिक येऊ लागला होता. या प्रकरणात गावामध्ये एलसीबीच्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी ठाण मांडलं आणि कसून चौकशी केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा, तर काही राशीतील लोकांना मिळणार आपलं प्रेम

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी मुलगी बेपत्ता

संबंधित प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावातील चाळीसगावात तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी मुलगी संशयिरित्या बेपत्ता झाली होती. तिचं नाव धनश्री शिंदे (वय 9) असे आहे. धनश्री बेपत्ता झाल्याची माहिती समजताच परिसरात खळबळ माजली आहे.

आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर...

या प्रकरणात आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुलगी शाळेतच होती आणि नंतर ती घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितलं. कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध केली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ती ग्रामपंयातीच्या दिशेने जाताना दिसली होती. पण, नंतर तिचा कसलाही मागोवा मिळालेला नाही.

हे ही वाचा : "तू काळी आहेस, अपशकुनी आहेस..." सासरी हुंड्यासाठी छळ अन् रंगावरून टोमणे! विवाहितेचे गंभीर आरोप...

गावाबाहेरील असलेल्या शेताच्या रस्त्यावरच धनश्रीचे दप्तर आढळून आले होते. नंतर एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp