जालन्यात 32 वर्षीय तरुणाची नदीत उडी मारत संपवलं जीवन, मृतदेह तरंगत आला पाण्यावर

Jalna Suicide : जालन्यात एका 32 वर्षीय तरुणाने गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथे ही घटना घडली.

Jalna Suicide

Jalna Suicide

मुंबई तक

16 Dec 2025 (अपडेटेड: 16 Dec 2025, 06:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जालन्यात 32 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

point

घटनेनं परिसरात हळहळ 

Jalna Suicide : जालन्यात एका 32 वर्षीय तरुणाने गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अंबड तालुक्यातील शहागड येथे ही घटना घडली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाल बळीराम पवार (वय 32 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूर हादरलं! पतीने महिलेसोबत बोलतानाचे चॅट्स पत्नीनं पाहिलं, संतापलेल्या आरतीने दोरीने गळा आवळत संपवलं जीवन

नदीपात्रात उडी घेतल्याने तरुणाचा पाण्यात बु़डून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील विशाल पवार हा रागाच्या भरात शहागड परिसरात आला होता. त्यानंतर त्याने गोदावरी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात उडी घेतली. घटनास्थळी कोणीही नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मृताचा मामा कैलास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : जळगावात 9 वर्षांची मुलगी शाळेत गेली, सायंकाळी घरीच आली नाही, 'त्या' ठिकाणी दप्तर सापडलं

घटनेनं परिसरात हळहळ 

दरम्यान, गोदावरी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती गोंदी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून शहागड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे शहागड परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.

    follow whatsapp