Latur Crime : लातूरमध्ये एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले आहेत. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यतील वरवंती गावात घडली होती. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आरती रामेश्वर उरगंडे असे होते. ती आपला पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगंडे, सासरे सिद्धेश्वर उरगंडे यांनीही या प्रकरणात त्यांचा मुलगा रामेश्वरला पाठिंबा दिला होता,
ADVERTISEMENT
हे ही वाचा : प्रेयसीला गाडीत बसवलं नंतर नको तेच... नग्न अवस्थेत मृतदेह दिला फेकून, धक्कादायक कांड समोर
'तुझ्या आई वडिलांच्या घरी जा' अन्...
आरती जेव्हा आपल्या घरात कोणत्याही वस्तूंची मागणी करायची तेव्हा 'तुझ्या आई वडिलांच्या घरी जा', असे तिला टोमणे मारू लागले होते. जवळजवळ एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. पती आणि सासरे तिला बेदम मारहाण करत छळ करायचे, नंतर ती तिच्या कुटुंबाला फोनद्वारे संपर्क करायची.
पती रामेश्वर फोन करून तिला शिवीगाळ करायचा
आरती जेव्हा तिच्या आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा तिचा पती रामेश्वर फोन करून तिला शिवीगाळ करायचा. आरतीच्या पालकांनी वारंवार, तिचा पती, आरती आणि सासरे स्वत: तिच्या आईला भेटण्यासाठी विवेकानंद रुग्णालयात आले होते. रुग्णालयात आल्यानंतर, आरती तिच्या आई आणि वडिलांनी अश्रू ढाळत सांगितलं की, तिचा पती हा रामेश्वर हा दुसऱ्या महिलेशी व्हॅट्सअॅपवर चॅट करत होता. आरतीने याबाबत रामेश्वरला विचारले असता, तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि नंतर शिवीगाळ केली.
वडिलांकडून सांत्वन
'तुला जे काम करायचं आहे ते करू शकतेस', माझा चांगला पाठिंबा आहे. वडिलांनी या प्रकरणात तिला सांत्वन दिले होते आणि त्याच दिवशी 3:30 वाजता तिला सायकलवरून तिच्या सासरच्या घरी घेऊन गेले होते. अर्ध्या तासानंतर, दुपारी 3:52 वाजता, आरतीने तिच्या वडिलांना फोन केला होता आणि नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतl होते.
गळफास घेत आत्महत्या
यानंतर आरतीचे वडील हे तिच्या घरी गेले आणि नंतर त्यांना तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडताना आढळून आला होता. सिद्धेश्वर आणि तिची सासू एकमेकांच्या शेजारील असलेल्या बेडवर बसली होती. दरवाजा तोडण्यात आल्यानंतर आरतीच्या वडिलांना दिसलं की, आरतीने पंख्याला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
हे ही वाचा : जळगावात 9 वर्षांची मुलगी शाळेत गेली, सायंकाळी घरीच आली नाही, 'त्या' ठिकाणी दप्तर सापडलं
या घटनेनंतर आरतीच्या वडिलांनी राजेंद्र दातेकर यांच्या तक्रारीवरून आरपीचा पती रामेश्वर उरगुंडे आणि सारसे सिद्धेश्वर उरगुंडे यांच्याविरुद्ध लातूर शहरातील एमआडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 108, 85, 115, 352. 3 (5) अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT











