Pune Crime : दिवाळी सणानिमित्त आता बाजारपेठेत फटाके, कपडे तसेच सणासाठी आवश्यक वस्तूंने देशभरातल्या बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. पुण्यातील विमानतळ परिसरात हातगाडीवर फटाके विक्री करणाऱ्या व्यक्तीने फटाके घेण्यासाठी आलेल्या लहान मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं विमानतळ परिसर हादरून गेला आहे. पीडितेसोबत अनुचित वर्तन केलेल्या व्यक्तीचं नाव अस्लम महंमद हुसैन शेख (वय 63) असे आहे. हा धक्कादायक प्रकार 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना हादरलं! सख्ख्या मामाने आपल्याच भाच्याच्या डोक्यात आणि पोटात रॉडने केला हल्ला, खूनाचं धक्कादायक कारण समोर
चुंबन घेत मुलीचा विनयभंग
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लम शेख हा हातगाडीवर फटाके विक्रीचं काम करत होता. तेव्हाच त्या ठिकाणी एक 9 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी एकटीच आली होती. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिला घरी नेलं आणि तिचं चुंबन घेत विनयभंग केला. नराधम आरोपीने लहान मुलीशी वाईट कृत्य केले. संबंधित प्रकरणाची माहिती समजताच मुलीच्या पालकांनी तात्काळपणे विमानतळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत भारतीय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एकूण पुढील तपास पोलीस करताना दिसताहेत.
हे ही वाचा : ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना, छठपूजेला जाताना एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पालकांना आपल्या मुलावर लक्ष ठेवण्याचे, तसेच इतर अनोळखी व्यक्तींशी संपर्कात येताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ADVERTISEMENT
