Pune Crime : पुण्यात मन सुन्न करून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींनी सतत तिचा छळ केल्याचा आरोप आहे. नंतर पीडिता कुटुंबापासून वेगळी राहू लागल्याने बेदम मारहाण करण्यात आली. याच त्रासाला कंटाळून महिलेनं जीवन संपवलं. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. पीडित महिलेच ( वय 34) होते. ही दुर्दैवी घटना 29 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवी मुंबईत नऊ वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, नंतर गळा दाबून संपवलं
फ्लॅट नावावर करून देण्यासाठी महिलेला दिला त्रास
संबंधित प्रकरणातील मृत व्यक्ती ही पुण्याच्या केशवनगर, मुंढवा येथे राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74) यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली होती. तृष्णाला पैसे, फ्लॅट नावावर करण्यासाठी शारीरिक आणि मानिसकरित्या त्रास देण्यात आला होता. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संपूर्ण पगार नवऱ्याला देण्याबाबत तृष्णावर दबाव
पोलिसांच्या माहितीनुसार, तृष्णा राहुल सपकाळचा विवाह हा 2018 मध्ये राहुल संजय सपकाळसोबत झाली. लग्नावेळी महिलेच्या माहेरच्या मंडळींनी तृष्णाला तब्बल 13 तोळे सोने देखील दिले होते. लग्नानंतर तृष्णावर संपूर्ण पगार आपल्या नवऱ्याला देण्यासाठी दबाव आणला जात होता. या व्यतिरिक्त माहरचा फ्लॅट सासूस वैशाली संजय मनोहरच्या नावावर करण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, तिचे सासरे संजय मनोहर सपकाळ यांनी कथिरित्या तृष्णाला त्यांच्या नावावर 1 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यास सांगितला.
तृष्णावर घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव टाकला
यानंतर तक्रारीनुसार, पीडितेला नवरा मारहाण करायचा आणि तिला घरातून हकलून दिले होते. तृष्णा तिच्या माहेरी परतली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्या पतीने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. प्रकरणातील आरोपांनुसार, तिच्या पतीने दुसरे लग्न करावे यासाठी तृष्णावर तिला घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव टाकला गेला. तिच्या सासरच्या मंडळींवर पैसे, फ्लॅट आणि तिच्या नणंदेच्या शैक्षणिक कर्जावरून तिचा छळ केल्याचा आोरप आहे.
हे ही वाचा : घरात शिरून महिलेचा फाडला ब्लाउज, नंतर अमानुष मारहाण
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, मृताच्या वडिलांनी त्याच्या तक्रारीत केलेल्या या मागण्या आणि कथिरित्या केलेल्या छळाबाबतचे अनेक आरोप केलेत. या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून न्यायालयात सिंद्ध होणे बाकी आहे. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, तृष्णाने 29 सप्टेंबर रोजी जीवन संपवलंय. या प्रकरणी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैला संजय सकपाळ आणि सासू शकुंतला साळुंके यांचा देखील समावेश आहे.
ADVERTISEMENT












