पुणे हादरलं, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार, कोयत्याने वार

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 04:29 PM)

Pune Crime News : पुण्यातील बालाजी नगर बस स्टॉपवर माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ बाळा मस्के याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलंय.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार

point

बस स्टॉपवर गोळीबार

Pune Crime News : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाचा बदला घेण्याचे सत्र सुरुच आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये थेट आरोपी असलेला आकाश मस्के याचा सख्खा भाऊ बाळा मस्के याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय. ही घटना पुण्यातल्या धनकवडी परिसरातील बालाजी नगर येथील गजबजलेल्या बस स्टॉपवर भरदिवसा घडली आहे. या धक्कादायक आणि थरारक हत्याकांडामुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांची लाही लाही होणार, IMD अलर्ट

खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावाला संपवण्याचा प्रयत्न

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाळा मस्के हा बालाजी नगरच्या बस स्टॉपवर थांबला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण कट रचून अत्यंत थंड डोक्याने अंमलात आणण्यात आल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी बाळा मस्के याच्यावर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने वार देखील केले आहेत.

गजबजलेल्या बस स्टॉपवर रक्ताचा सडा

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. या आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आकाश मस्के याला मुख्य आरोपींपैकी एक म्हणून अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. मात्र, आंदेकर समर्थकांकडून किंवा संबंधित टोळीकडून या खुनाचा वचपा काढण्यासाठी आकाश मस्केच्या कुटुंबाला लक्ष्य केले गेल्याची चर्चा आहे. अखेर त्याचाच भाऊ बाळा मस्के याला गाठून हल्लेखोरांनी आंदेकर यांच्या मृत्यूचा थेट बदला घेतला असून, या कृत्यामुळे शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा समोर आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shivraj Motegaonkar: सायकलवरून शिकवायला जाणारा शिक्षक ते 100 कोटींचा कोचिंग किंग!