Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात काही प्रमाणत बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी कोरडं हवामान राहण्याची अधिकची शक्यता आहे. तर काही भागांना काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 4 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवविला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लातूर: खोलीत वेश्याव्यावसायाचं रॅकेट, पोलिसांचा छापा अन् आढळली कंडोमची पाकिटे
कोकण
कोकणात पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरड्या हवामानाची अधिक शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : लातूर: 6 वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी अंत
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












