लातूर: खोलीत वेश्याव्यावसायाचं रॅकेट, पोलिसांचा छापा अन् आढळली कंडोमची पाकिटे

मुंबई तक

Latur crime : लातूर पोलिसांनी एका घरात छापा मारत अल्पवयीन मुलीसह इतर चार महिलांना कथितरित्या देह व्यापारापासून मुक्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार, होळकरनगर परिसरातील एका भाडेतत्त्वाच्या घरात महिलांना वेश्याव्यवसायासाठी बोलावले होते.

ADVERTISEMENT

Latur crime
Latur crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा

point

घटनास्थळी कंडोमच्या पाकिटांचा समावेश

Latur Crime : अनिकेत जाधव - लातूर पोलिसांनी एका घरात छापा मारत अल्पवयीन मुलीसह इतर चार महिलांना कथितरित्या देह व्यापारापासून मुक्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार, होळकरनगर परिसरातील एका भाडेतत्त्वाच्या घरात महिलांना वेश्याव्यवसायासाठी बोलावले होते. यानंतर अॅन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेदरम्यान, महिला आणि एका पुरूष साथीदाराला पकडले होते. दोघेही मिळून एका भाडेतत्त्वाच्या घरात हा गैरप्रकार चालवत होते. 

हे ही वाचा : नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला संपवलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून 'ते' कारण समोर

भाडेतत्त्वाच्या घरात वेश्याव्यवसाय आणि कंडोमच्या पाकिटांचा समावेश

ही घटना लातूर शहरातील होळकर भागातील असून मानवी तस्करी विरोधी पथकाला माहिती मिळाली की, एका भाडेतत्त्वाच्या घरात महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. या माहितीच्या आधारे पथकाने त्या घरावर छापा टाकला. घटनास्थळावरून एका अल्पवयीन मुलीसह इतर चार महिलांची सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी अंदाजे, 7 हजार रुपये किंमतीला माल जप्त करण्यात आला, ज्यात 2 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि कंडोमच्या पाकिटांचा देखील समावेश करण्यात आला. 

आरोपी प्रियंका आणि साथीदार गोविंदला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रियंका आणि तिचा साथीदार गोविंदला अटक करण्यात आली आहे. प्रियंकाने कथितरित्या घर भाड्याने घेतले आणि तिथे महिलांना आमिष दाखवून वेश्याव्यवसाय चालवण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, या प्रकरणात गोविंदा नावाच्या व्यक्तीचा देखील समावेश होता. पोलिसांना घटनास्थळी एक अल्पवयीन मुलगी देखील आढळून आली होती आणि तिची सुखरूप सुटका करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत कायदा आणि बाल न्याय कायद्यान्वये कारवाई केली आहे. पीडित महिलांना आरोपीच्या ताब्यातून सोडण्यात आले असून पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय. 

हे ही वाचा : लातूर: 6 वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी अंत

लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाई पोलीस उपअधीक्ष डॉ. भागीरथी पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील आणि मानवी सत्करी विरोधी पथकातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने हा छापा टाकला होता. पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.