लातूर: 6 वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी अंत

मुंबई तक

Latur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलीस ठाणे परिसरातील रामघाट तांडा गावात एका 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगी खेळताना तिचा विहिरीत तोल जाऊन बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

Latur News
Latur News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विहिरीत पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू 

point

घटनास्थळी पोलीस दाखल 

Latur News : अनिकेत जाधव - लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलीस ठाणे परिसरातील रामघाट तांडा गावात एका 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगी खेळताना तिचा विहिरीत तोल जाऊन बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आहे. मृत मुलीची सोनाक्षी संतोष जाधव अशी ओळख समोर आली. सोनाक्षी ही आपल्या आईसोबत रामघाट तांडा येथील रहिवासी होती. 

हे ही वाचा : नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला संपवलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून 'ते' कारण समोर

विहिरीत पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू 

घडलेल्या घटनेनुसार, सोनाक्षी ही आईसोबत शेतात काम करण्यासाठी गेली होती. तेव्हा सोनाक्षी ही एका विहिरीच्या शेजारी खेळत होती. विहिरीच्या शेजारी कोणतेही कंपाउंड नव्हते, इतक्यात पाय घसरून सोनाक्षी विहिरीत पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाक्षी कुठेच दिसत नाही, हे पाहताच ग्रामस्थांनी तिचा शोध घेतला होता. 

हे ही वाचा : MPSC च्या वर्तुळात काय सुरू आहे? रोहित पवारांनी काय सांगितलं?

घटनास्थळी पोलीस दाखल 

तब्बल 2 तास शोध घेऊन ग्रामस्थांना सोनाक्षीचा मृतदेह विहिरीत पडलेल्या स्वरुपात आढळला होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच, उदगीर ग्रामीण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नंतर सोनालीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत.