पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्यांचा हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत केली बेदम मारहाण

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 10:12 PM)

Pune Crime News : पुणे शहरातील धनकवडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली आहे.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरातील धनकवडीत धक्कादायक प्रकार

point

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

Pune Crime News : पुणे शहरातील धनकवडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली आहे. या घटनेनं धनकवडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना 24 जून रोजी रात्री 10 वाजता घडली आहे. पीडित व्यक्ती प्रवीण यशवंत पाटील (वय 56) असे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

हे वाचलं का?

प्रवीण पाटील हे राजीव गांधी वसाहत परिसरातून त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात होते. यावेळी तरुण एकत्रितपणे रस्त्याच्या मधोमध उभे राहून गप्पा मारत होते. त्याच ठिकाणी त्यांच्या काही दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या, त्या गाड्या काढण्याची प्रवीण पाटील यांनी विनंती केली आणि यातूनच वादाला तोंड फुटले.  

हेही वाचा : धनशक्ती राजयोगामुळे 'या' राशींच्या लोकांचे खिसे कधीच राहणार नाहीत रिकामे

पीडित पुरुषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण 

सुनील गौतम कसबे (वय 30), जतिन मधुकर बोले (वय 22) आणि त्यांच्या काही साथीदारांनी प्रवीण पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि प्रवीण यांच्यावर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

या हल्ल्यात प्रवीण पाटील यांच्या डोळ्याला दुखापत झाली, तसेच त्यांचं नाक रक्तबंबाळ झालं. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केली. तसेच गृहनिर्माण संस्थेतील काही महिलांनी कांगावा केला. लोक जमू लागताच हल्लेखोरांनी घटनास्थळापासून पळ काढला. 

हेही वाचा : कोकणासह, पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस, 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी

दरम्यान, पीडित निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास एका नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीनंतर सहकारनगर पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावल्या आहेत आणि कारवाई केली जाईल, अशी माहिती निरीक्षक राहुल गौड यांनी दिली.