महिलेचे एकाचवेळी दोन अनैतिक संबंध दुसऱ्या प्रियकराला माहिती मिळताच तळपायाची आग मस्तकात अन्...

Pune Crime News : पुणे विभागातील पिंपरी चिंचवडमध्ये दुहेरी हत्याकांड समोर आलेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या तळवडे परिसरात विवाहबाह्य अनैतिक हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे.

pune crime

pune crime

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 08:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधामुळे गुन्हेगारीत वाढ

point

महिलेचं परपुरूषासोबत अनैतिक संबंध

Pune Crime News : राज्यातच नाहीतर देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना घडत आहेत. या अनैतिक संबंधामुळे गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. आता देहूरोडच्या घटनेत अनैतिक संबंधातून दोघांचा खून करण्यात आला आहे. जगन्नाथ पुंडलिक सरोदे आणि मंगला नावाच्या एका महिलेची हत्या करण्यात आलीय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा आरोप, चहाच्या टपरीवर नेमकं काय घडलं होतं?

या प्रकरणी आरोपी दत्तात्रेय साबळेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रेयनं खूनाचा कबुलीनामा दिला आहे. मृत महिला आणि जगन्नाथ यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती महिलेचा दुसरा प्रियकर दत्तात्रेय साबळेला मिळाली होती. दत्तात्रेय साबळेनं सदर महिला आणि जगन्नाथ यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांची हत्या केली.

नेमकं घडलं काय? 

संबंधित प्रकरणाची माहिती देहुरोड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. झपाट्याने तपास केला आणि दत्तात्रयला ताब्यातही घेतलं. मंगलाचे जगन्नाथ सरोदे आणि दत्तात्रेय साबळे यां दोघांशीही प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री उशिरा मंगला आणि जगन्नाथ एकत्र आले. ते एकाच खोलीत झोपले होते. त्याच वेळी आरोपी दत्तात्रेय साबळे देखील तिथे पोहोचला. दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहून आरोपी दत्तात्रेय संतापला आणि तिघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून दत्तात्रेयने दोघांनाही दगडाने ठेचून ठार मारले, अशी माहिती समोर येतेय. देहू रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे परिसरात ही घटना घडली. मंगला विवाहित आहे, तिच्या नवऱ्यानेच या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून देहू रोड पोलिस पुढील तपास करत आहेत.

संबंधित प्रकरणाची माहिती देहुरोड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी खूनाचा तपास करताना पोलिसांनी दत्तात्रेय साबळेची एकूण माहिती मिळवली. या प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी दत्तात्रेय साबळेंची चौकशी केली. या चौकशीतून दत्तात्रेय साबळेनं हत्येची कबूली दिली. मृत महिला आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे या दोघांचे एकमेकांशी अनैतिक संबंध होते. याची माहिती दत्तात्रेय साबळेला होती. दोघांना एकत्रित पाहिल्यानंतर दत्तात्रेयच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि दोघांचा खून करण्यात आला. 

हेही वाचा : पुतण्या काकीसोबत रोज शारीरिक संबंध करायचा..एक दिवस घडलं भयंकर! प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये

 

    follow whatsapp