'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 01:21 PM)

pune news : पुणे शहरातील पुणे स्टेशनच्या नामांतरावरून राजकीय वाद पेटला आहे. पुणे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशवेंचं नाव द्यावं अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

pune news

pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे स्टेशनच्या नामांतरावरून राजकीय वाद

point

बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा

Pune News : पुणे शहरातील पुणे स्टेशनच्या नामांतरावरून राजकीय वाद पेटला आहे. पुणे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशवेंचं नाव द्यावं अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. यानंतर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे रेल्वेस्थानकाला राजमाता जिजाऊंचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे. तर या नामांतरणावरुन काहींनी पोस्टरबाजी करत 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', असं म्हणत टोला लगावला आहे. यामुळे एका दिवसात पुण्यातील राजकारणात नामांतरणावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पोलीस कर्मचाऱ्यानं लेकीला संपवलं, नंतर स्वत:चाही केला शेवट; नाशिकमधली थरकाप उडवणारी घटना काय?

'...तर बुधवारी पेठेचं नाव मस्तानी पेठ करा'

पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात पोस्टरबाजी सुरू असल्याचं चित्रं आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला प्रत्युत्तरादाखल पॉस्टरबाजी केली जाते. एका पोस्टरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढीच खुमखुमी असेल तर बुधवारी पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, अशा आशयाच्या मजकुराची बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी शिवसेना उबाठा गटाकडून होत आहे. 

हेही वाचा : ढाब्यावरचं ते जेवण शेवटचं ठरलं! संभाजीनगरमध्ये कारचा अपघात, तीन मित्र जागीच ठार, तर दोघे...

श्रीमंत कोकाटे काय म्हणाले? 

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे म्हणाले की, पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली होती. त्यावेळी हे शहर आदिलशाहने उद्धस्त केल्याचं ते म्हणाले. या शहरात मानवी वस्ती होणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवलं.

पुणे शहराला नव्याने वसवण्याचे काम हे राजमाता जिजाऊंनी केलं. यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने पुणे रेल्वे स्टेशनला नाव द्यावं. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पेशवे लढलेच नसते. आपण जिंकू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनी निर्माण केल्याचं श्रीमंत कोकोटे म्हणाले. तसेच त्यांनी मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा विरोध केला.