Parada Spring Collection: प्राडा (Parada) ने नुकतंच आपलं स्प्रिंग-समर कलेक्शन (Spring Summer 2026 Men’s collection) लॉन्च केलं आहे. या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी स्टाइल चप्पलचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या अनोख्या स्टाइल सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असताना कंपनी वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय. कंपनी या चप्पलाच्या स्टाइलचे भारताला श्रेय द्यायला विसरल्याने अचानक वाद निर्माण झाला. कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांकडे आणि या चप्पलाची खरी ओळख दुर्लक्षित झाल्यामुळे लोकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर निर्माण झाला वाद!
प्राडाच्या रनवेवर मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पल परिधान केल्याचे दिसताच लोकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अडाजानिया यांनी देखील या शोचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "ही तर आमची जुने कोल्हापुरी चप्पल आहे."
फॅशन क्रिटिक डाइट साब्यानेही त्यांच्या इंस्टाग्रामवर म्हटले आहे की, "आता आपण युरोपमध्ये फॅशन म्हणून विकल्या जाणाऱ्या 1000 यूरो (Euro) किमतीच्या प्राडाच्या कोल्हापुरी चप्पलसाठी तयार आहोत."
डाएट साब्याने असंही म्हटले की, "सध्याच्या काळात 'मेड इन फ्रान्स' आणि 'मेड इन इटली' प्रोडक्ट्सपेक्षा 'मेड इन इंडिया' प्रोडक्ट्स युरोपियन ब्रँडच्या नावाने बाजारात जास्त विकली जात आहेत. या प्रोडक्ट्सचं सर्व काम आणि आर्टिसनल फ्लेक्स भारतातच तयार केले जातात."
हे ही वाचा: प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन् झाला मोठा कांड!
प्राडाच्या या नवीन लॉन्चमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काही लोक याला भारतीय परंपरेचा अपमान मानत आहेत तर काहीजण याला अभिमानाची बाब म्हणत आहेत. यावर कमेंट करत एकाने लिहिले, "ही माझ्या आजोबांच्या चप्पलासारखी दिसते," तर दुसऱ्याने लिहिले, "सरोजिनी आता इंटरनॅशनल झाली आहे."
कोल्हापुरी चप्पल- भारतीय वारशाचं प्रतीक
महाराष्ट्रातील कोल्हापूर या छोट्या शहरातून राज्यभरात ओळख मिळवलेली ही कोल्हापुरी चप्पल भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहेत. कोल्हापुरी पायतान म्हणून ओळखली जाणारी ही चप्पल कुशल कारागिरांकडून अतिशय चांगल्या दर्जाच्या चामड्यापासून बनवली जाते. ही केवळ टिकाऊच नाही तर घालण्यासही अत्यंत आरामदायी आहे. 2019 मध्ये त्यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला. यावरुन त्यांचं जागतिक महत्त्व दिसतं.
हे ही वाचा: पोलीस कर्मचाऱ्यानं लेकीला संपवलं, नंतर स्वत:चाही केला शेवट; नाशिकमधली थरकाप उडवणारी घटना काय?
कोल्हापुरी चप्पलचा इतिहास
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कोल्हापुरी चप्पलचा इतिहास 12 व्या शतकाचा असल्याचं फॅशन कम्युनिकेशन विभागाच्या असोसिएट प्रोफेसर श्वेता नावंदर यांनी म्हटलं. राजा बिज्जला आणि त्यांचे पंतप्रधान विश्वगुरू बसवण्णा यांनी कारागीर समुहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी हे काम केले. परंतु 20 व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या चप्पलांचा व्यावसायिक विस्तार झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











