प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन् झाला मोठा कांड!

मुंबई तक

उदयपूरमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न ठरल्यामुळे तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन्...
प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेवटच्या भेटीसाठी प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवलं अन्...

point

प्रेयसीचं लग्न ठरल्यावर नाराज प्रियकाराने काय पाऊल उचललं?

point

प्रेयसी आणि प्रियकराच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Udaipur Crime: उदयपूरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न ठरल्यामुळे तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हॉटेलमध्ये बोलवून केली हत्या

उदयपूरच्या हिरण मगरी पोलीस स्टेशन परिसरातील परशुराम चौकात असलेल्या कासा गोल्ड हॉटेलमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. त्यांचं बोलणं सुरू असताना अचानक त्यांच्यात वाद झाला. रागात येऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटलं आणि यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 

प्रेयसीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने आपल्याच हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तरुण तिथून पळून गेला. सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोली साफ करताना तिथे तरुणीचा मृतदेह दिसला आणि त्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. 

कोण होते ते प्रेयसी आणि प्रियकर? 

मृत तरुणीचं नाव निकिता त्रिवेदी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. निकिता मुळ ऋफभदेवची रहिवासी असून ती नर्सिंगच्या शिक्षणासाठी उदयपूरला राहत होती. तिथे ती आपल्या भावासोबत राहत होती. तसेच, आरोपी तरुणाचं विजय भोई असून तो उदयपूरच्या सेक्टर 3 चा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp