Pune crime : लोखंडी रॉडसह फावड्याने तरुणाला अमानुष मारहाण, नंतर हल्लेखोर स्वत:हून पोलिसांकडे गेले अन्...

Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका जीन ट्रेनरने आणि त्याच्या साथीदाराने एका तरुणाला लोखंडी रॉडसह फावड्याने जबर मारहाण केली, यामागचं कारण समोर आलं.

pune crime

pune crime

मुंबई तक

14 Aug 2025 (अपडेटेड: 14 Aug 2025, 05:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाला लोखंडी रॉडसह फावड्याने जबर मारहाण

point

पुण्यातील दिघी परिसरातील घटना

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका जीम ट्रेनरने आणि त्याच्या साथीदाराने एका तरुणाला लोखंडी रॉडसह फावड्याने जबर मारहाण केली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ वर्पे असे आहे. ही घटना पुण्यातील दिघी परिसरातील आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आरोपी जीम ट्रेनरचे नाव प्रांजल तावरे असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जीम ट्रेन प्रांजल तावरेचं आणि यश पाटोळेचं चरहोली येथे प्रोटीन पावडरचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी लल्ला वरपे दुकानावर आणि प्रांजलशी अगदी खालच्या पातळीत बोलू लागला. यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर लल्लाने प्रांजलला शिवीगाळ केली असता, प्रांजल संतप्त झाला. त्यांने लोखंडी रॉड आणि फावड्याने लल्लावर हल्ला केला.

या हल्ल्यात लल्ला गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर प्रांजल आणि यश हे दिघी पोलीस ठाण्यात गेले आणि सरेंडर झाले. दरम्यान, दोघेही जीम ट्रेनर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, लल्लाचा मृत्यू मृतदेह दिसला. 

हे ही वाचा : Pune News Metro : पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर होणार, गर्दीच्या वेळी सहा मिनिटांनी मेट्रो धावणार

प्रांजल आणि यश सरेंडर 

दरम्यान, या मारहाणीत असणाऱ्या दोन्ही आरोपींना दुखापत झाली होती, असे पोलिसांनी सांगितलं. प्रांजल आणि यश हे दोघेही व्यवसायाने जीम ट्रेनर आहेत. तसेच ज्या तरुणाचा खून करण्यात आला त्याला ते आधीपासूनच ओळखत होते. दिल्ली पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

    follow whatsapp