Pune News : पुण्यात मेट्रोचं जाळं उभारलं गेल्याने पुणेकरांना त्याचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. पुण्यात 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी पुणेकरांना मेट्रोची फार वेळ पाहावी लागणार नाही. कारण दोन्ही कॉरिडॉरवरील मेट्रोच्या सेवा गर्दीच्या वेळेतच असल्याने मेट्रो सहा मिनिटांच्या फरकाने धावणार आहेत. यामुळे दररोज 64 अतिरिक्त फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिवसाच्या एकूण फेऱ्या या 490 वरून 554 वाढतील.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...
दोन लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या नेटवर्कमधील पीसीएमसी स्वारगेट आणि वनाझ-रामवाडी मार्गातील अंतर 33.2 किमी आहे. यातील 27.2 किमी एलिव्हेटेड आणि उर्वरित 6 किमी अंतर हे अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत असेल. तर या भूमिगत स्थानकांमध्ये शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचा समावेश आहे. पूर्णपणे कार्यरत असलेल्या कॉरिडोरद्वारे दररोज दोन लाखांहून अधिक लोकांना सेवा दिली जाते.
गणेशोत्सव सणासाठी चांगला फायदा
दरम्यान, सध्याच्या नवीन वेळापत्रकानुसार, मेट्रो रेल्वे सकाळी 8 ते 11 वाजता दर सहा मिनिटांनी धावतील आणि पुन्हा दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत धावतील. तर नॉन पिकअवरचा विचार केल्यास मेट्रो प्रत्येकी 10 मिनिटांवर धावणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, याचा गणेशोत्सव सणासाठी चांगला फायदा होईल.
हे ही वाचा : मित्राने तरुणीला पार्टीला बोलावले, नंतर दारूत मिसळले औषध, तिला बाथरूममध्ये नेलं अन् आळीपाळीने सर्वांनीच...
कारण प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. महा मेट्रोच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की, या बदलामुळे सेवेत आतापर्यंत 13 टक्के वाढ झाली आहे. सहा मिनिटांच्या वेळेचं अंतर ठेवून पुण्यातील मेट्रोनं प्रवास करण्याची पुणेकरांना संधी मिळणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास जलद होईल आणि वेळ वाचेल.
ADVERTISEMENT
