मित्राने तरुणीला पार्टीला बोलावले, नंतर दारूत मिसळले औषध, तिला बाथरूममध्ये नेलं अन् आळीपाळीने सर्वांनीच...
Delhi Crime News : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा हादरून गेली आहे. एका निष्पाप तरुणीवर गँग रेप केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे, नेमकं प्रकरण काय घडलं जाणून घ्या.

बातम्या हायलाइट

राजधानी दिल्ली पुन्हा हादरली

मित्राने पार्टीसाठी घरी बोलावलं

नंतर भयंकर घडलं
Delhi Crime News : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा हादरून गेली आहे. एका निष्पाप तरुणीवर गँग रेप केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना सिव्हिल लाइंस परिसरात घडली आहे. काही नराधमांनी पार्टीदरम्यान पीडितेचे लैंगिक शोषण केले. या घटनेनं दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणात आरोपींवर कारवाई केली असून आरोपींचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा : ऑगस्टमध्ये शनि-शुक्र केंद्र योग, शनिची हालचाल आणि काही राशीतील लोकांच्या आयुष्याला कलाटणी
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनुसार, गुरूग्राम स्थित असलेल्या एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आले. पार्टीदरम्यान, उपस्थित असणारे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिसांनी सांगितलं की, सिव्हिल लाइंस येथे एका मित्राच्या घरी पार्टी असल्याने आमंत्रित करण्यात आले होते. तरुणी पार्टीसाठी गेली.
एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे सांगितलं की, 'तिथे तिला तिचा मित्र, एक ओळखी तरुण आणि इतर दोन मुलं भेटली. महिलेनं सांगितलं की, रात्री उशिरापर्यंत सर्वांनी पार्टी केली आणि मद्यधुंद झाले. तिनं सांगितलं की, रात्रीच्या वेळी तिच्या मद्यात काही तरी मिसळलं होतं आणि ते प्यायलाने पीडित तरुणी बेशुद्ध पडली.
तरुणांनी तिला बाथरूममध्ये नेले अन्...
त्यानंतर त्या चारही तरुणांनी तिला बाथरूममध्ये नेले आणि आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेनं सांगितलं की, आरोपींनी मारहाण केली आणि पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवला. ते नराधम एवढेच थांबले नाही,तर त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं की, तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करेन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिला घराबाहेर सोडले आणि महिलेनं पोलिसांना फोनद्वारे संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला.
हे ही वाचा : सचिन तेंडुलकर सासरा होणार, सूनबाईंची चर्चा तर... ‘या’ तरुणीने काढली अर्जुनची विकेट!
महिला अधिकाऱ्याने फोनला प्रतिसाद देत पुढील प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पीडितेनं केलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, आता पोलिसांनी सिव्हिल लाईन्समधील घराला भेट दिली असता, नराधम हाती लागले नाहीत.