Pune: ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Pune Ganeshostav: ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे.

pune immersion procession of shrimant bhausaheb rangari bappa will start from shri ganesh ratna ratha

Pune Ganeshostav

मुंबई तक

• 09:09 PM • 04 Sep 2025

follow google news

पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली. 

हे वाचलं का?

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा 'श्री गणेश रत्न रथ' विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल.

हे ही वाचा>> गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था! 17,000 हून अधिक पोलीस तैनात...

त्यानंतर दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने ‘श्री गणेश रत्न रथ’ सजविण्यात आला असून या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाचे जोरदार वादन करणार आहेत, यानंतर रात्री अकरा वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे करण्यात येईल. "पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवू असा आमचा मानस असल्याचेही बालन यांनी सांगितले.

हे ही वाचा>> गणेश चतुर्थी 2025: जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान! प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांची उपस्थिती...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन पुढे म्हणाले की, ‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’


 

    follow whatsapp