पुण्याची गोष्ट : पुण्यातील कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय म्हणून राजीव गांधी संग्रहालयाची ओळख आहे. याच प्राणी संग्रहालयात राज्यासह देशभरातून तसेच काही परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावत असतात. पण, आता या प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे महापालिकेनं या संग्रहालयाला भेट देण्यासाठी तब्बल 50 टक्क्यांहून शुल्कात अधिकची वाढ केली जाईल असा प्रस्ताव तयार केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालन्यातील तरुणाचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, दीर-भाऊजयीने मिळून नवऱ्याला कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं
'या' गोष्टींसाठी शुल्कात अधिकची वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन, तसेच प्राण्याची देखरेख करणे, खाद्यासाठी खर्च, तसेच इतर देखभाल खर्चात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच महापालिका देखील निधी वाढवून देणार असल्याचं बोललं जात आहे.
संग्रहालयाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी
महापालिकेच्या अंदाजपत्रकात संग्रहालयाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या काळात या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवेशशुल्कही वाढवण्याचा आणखी प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.
हे ही वाचा : पोटच्या लेकराला आईने जळत्या चुलीत फेकलं, नंतर साडीने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणाले, तिचा पती...
तिकीटांचे दर पुढीलप्रमाणे...
दरम्यान, लहान मुलांसाठी 4 फूट 4 इंच असलेल्या मुलांसाठी 10 रुपये तिकीट आकरण्यात आले आहेत. तसेच प्रस्तावानुसार 20 रुपये करण्यात येतील. तर पौढांसाठी 40 रुपयांचे 60 रुपये तिकीट आकारण्यात येतील. तसेच विदोशी पर्यटकांसाठी 900 रुपयांहून 1350 रुपये करण्याची शक्यता आहे. हा दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने समितीसमोर उद्यान विभागामार्फत समितीसमोर ठेवलेला आहे.
ADVERTISEMENT











