पुण्याची गोष्ट : कर्वेनगरमध्ये 3 दिवसांपूर्वी केलेल्या उड्डाणपुलाचे डांबर वितळले, वाहतुकीसाठी तात्पुरता रस्ता बंद

Pune News : पुण्यात उन्हाचा पारा अधिक चढला आहे. नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतेय, अशातच महापालिकेच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. कर्वेनगर येथील बराटे उड्डाणपुलावर अवघ्या तीन दिवसांपूर्वी रस्त्यावरील डांबर वितळून गेल्याचं चित्र आहे. रस्त्यावरील डांबर वितळून वाहत असल्याने हा रस्ता चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Pune News

Pune News

मुंबई तक

• 07:52 PM • 17 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उन्हाचा चटका वाढला अन् रस्त्यावरील डांबर वितळले

point

डांबर वितळल्याने दुचाकी स्वारांच्या प्रवासासाठी मोठा गंभीर प्रश्न

पुण्याची गोष्ट : पुण्यात उन्हाचा पारा अधिक चढला आहे. नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतेय, अशातच महापालिकेच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. कर्वेनगर येथील बराटे उड्डाणपुलावर अवघ्या तीन दिवसांपूर्वी रस्त्यावरील डांबर वितळून गेल्याचं चित्र आहे. रस्त्यावरील डांबर वितळून वाहत असल्याने हा रस्ता चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने संबंधित उड्डाणपूल बंद केला आहे. या पुलावरून प्रवास न करण्याचे आवाहन केलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड हादरलं! परळी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन, काही दिवसांत बांधणार होता लग्नगाठ

उन्हाचा चटका वाढला अन् रस्त्यावरील डांबर वितळले

काही दिवसांपूर्वी उन्हाचा चटका अधिक वाढला आहे. हीच स्थिती लक्षात घेता रस्त्याचे झालेले काम हे तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे असल्याचे मानले जातेय. पुलाच्या या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते, पण वाढत्या उन्हामुळे रस्त्याला केलेले डांबरीकरण वितळले गेले. यामुळे प्रवास करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होईल. वाहनांचे टायर घसरू शकतात, यामुळे प्रशासनाने हा पूल बंद करून टाकला आहे. 

डांबर वितळल्याने दुचाकी स्वारांच्या प्रवासासाठी मोठा गंभीर प्रश्न

याच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून अनेक लोक जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करतात. रस्त्याचे डांबर वितळल्याने दुचाकी स्वारांच्या प्रवासासाठी मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. टायरला डांबर चिकटू शकते आणि त्यामुळे वाहनांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने स्थानिकांनी महापालिकेवर तीव्र शब्दांत टीकेचे अस्त्र ओढले. 

स्थानिकांचा तीव्र संताप 

स्थानिकांनी तीव्र संताप करत सांगितलं, अशा कामासाठी आम्ही भरलेला टॅक्स वापरला जातोय का? डांबरी काम करण्याची अतिघाई नेमकी कोणी आणि कशासाठी केली. वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा कोणी तपासला? असे प्रश्न उपस्थित आहे.  

हे ही वाचा : जालना : आई बाहेरगावी गेली अन् मैत्रिणीला घरी बोलावले, नंतर साहिलने केले भयानक कांड

संबंधित रस्त्याच्या कामाबाबत कंत्राटदाराने पैशांचा अपव्यय असल्याचे सांगत, कंत्राटदारांना देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.