पुणे तिथे काय उणे! मतदारांना वाटल्या 'चांदीच्या' भेटवस्तू, पण निघाल्या खोट्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रताप...

पुण्यात देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क चांदीच्या वाट्या आणि चमचे वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे मतदारांना वाटलेल्या चांदीच्या भेटवस्तू ह्या खोट्या निघाल्या. नेमकं प्रकरण काय?

मतदारांना वाटल्या खोट्या 'चांदीच्या' भेटवस्तू

मतदारांना वाटल्या खोट्या 'चांदीच्या' भेटवस्तू

मुंबई तक

14 Jan 2026 (अपडेटेड: 14 Jan 2026, 02:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मतदारांना वाटल्या 'चांदीच्या' भेटवस्तू, पण निघाल्या खोट्या

point

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा संतापजनक प्रताप...

Pune News: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाच्या उमेदवारांकडून अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी उमेदवारांकडून मतदारांना पैसे तसेच भेटवस्तू दिल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुण्यात देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क चांदीच्या वाट्या आणि चमचे वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे मतदारांना वाटलेल्या चांदीच्या भेटवस्तू ह्या खोट्या निघाल्या. नेमकं प्रकरण काय? 

हे वाचलं का?

चांदीचं कोटिंग केलेल्या भेटवस्तू 

निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्यात एका उमेदवाराने लोकांना चक्क चांदीच्या वाट्या आणि चमचे वाटले. मात्र बारकाईने पाहणी केल्यानंतर या वाट्या खऱ्या चांदीच्या नसून त्यावर केवळ चांदीचं कोटिंग केलं असल्याचं निदर्शनास आलं. वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांना हे प्रकरण लक्षात आलं आणि तपासादरम्यान, त्याच्या वाहनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे, टेम्पलेट्स तसेच चांदीसदृश वाट्या आणि चमचे आढळून आले. 

हे ही वाचा: पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा; नेमकं काय सापडलं?

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोट्या चांदीच्या भेटवस्तू देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

गाडीतून जप्त करण्यात आलेल्या वस्तू 

1. काळ्या रंगाची आयु सुझु मोटर्स व्ही-क्रॉस वाहन, क्रमांक MH 12 WZ 8004
2. लाल रंगाची एकूण 314 चौकोनी आकाराची लहान पाकिटे; प्रत्येक पाकिटात एक चांदीसदृश धातूची वाटी व एक चमचा
3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, घड्याळाचे चिन्ह व इतर माहिती असलेली एकूण 24 कागदी पॅम्पलेट्स
4. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह असलेले तीन झेंडे; त्यापैकी दोन झेंड्यांना काठ्या लावलेल्या, तसेच दोन झेंड्यांवर प्रकाश विठ्ठलराव कदम यांचे नाव छापलेले
5. प्रकाश विठ्ठलराव कदम, प्रभाग क्रमांक 38 यांचे नाव असलेले माहिती पुस्तिकेचे 1 नग

    follow whatsapp