पुणे : बुधवार पेठेत मध्यरात्रीच पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन; अनेकांची उडाली तारांबळ, नेमकं काय घडलं?

Pune News : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीप्रकरणी कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. संबंधित तरुणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे तसेच आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला.

Pune News

Pune News

मुंबई तक

• 09:12 AM • 11 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बुधवार पेठेत मध्यरात्रीच पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन

point

अनेकांची उडाली तारांबळ

Pune News : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीप्रकरणी कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. संबंधित तरुणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे तसेच आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : तरुणी रेल्वे स्टेशनच्या शौचालयात गेली, नंतर बराच वेळ बाहेरच येईना; दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार समोर

वेश्यागमनासाठी आलेल्या लोकांना रस्त्यावर बसवलं

स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा ताफा रात्री 12 वाजता बुधवार पेठेत दाखल झाला. परिसरात ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली. तसेच परिसरात वेश्यागमनासाठी आलेल्या  लोकांना ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवलं. अमली पदार्थांचा वापर, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर पोलिसांनी अनेक संशयितांची कसून चौकशी केली.

हे ही वाचा : जामखेड : माझा नंबर का ब्लॉक केला? संतापलेल्या गेवराईच्या तरुणाने नृत्यांगणेवर केले कोयत्याने वार

मध्यरात्री 12 ते 3 पर्यंत चालले ऑपरेशन

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्रीच धडक कारवाई केली. यावेळी 12 ते 3 वाजेपर्यंत झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान, बुधवार पेठेतील 50 हून अधिक घरांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. येथील कुंटणखान्यात महिला पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी बुधवार पेठेतील प्रत्येक गल्लीत पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
 
    follow whatsapp