Titwala Accident : कल्याण येथील टिटवाळा-गोवेली रोड परिसरातील घोत्साई काटे येथे एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात वेगाने आलेल्या एका पिकअपने एका महिलेला धडक दिली. या धडकेत महिला चिरडली गेल्याची घटना आहे. या घटनेचा पूर्ण थरार हा CCTV मध्ये कैद करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत
अपघातात महिलेचा मृत्यू
व्हिडिओत पाहिल्यानंतर दिसते की, हा अपघात झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या अपघातातील मृत महिलेचं नाव सुरेखा खंडागळे आहे. सांगण्यात येत आहे की, ही धक्कादायक घटना टिटवाळा-गोवेली रोड परिसरात घडल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, सुरेखा खंडागळे या महिला घरी जात होत्या, त्याचक्षणी एका भरधाव वेगाने एक पिकअप आले आणि त्या पिकअपने महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेचा चेंदामेंदा झाला. हा अपघात भयानक होता. या घटनेचा थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला होता.
हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..
पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल
या भीषण अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी असलेला मृतदेह ताब्यात घेतला. पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच रस्त्यावर अनेक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता स्थानिकांना जिथे अपघाताची संख्या अधिक आहे, तिथेच स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











