बीडमध्ये सात महिन्याच्या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकलं, लहान बाळाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Beed Crime : बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर तिचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

beed news

beed news

मुंबई तक

• 05:25 PM • 11 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक

point

मुलीच्या घशात चॉकलेट अडकलं

point

नेमकं काय घडलं?

Beed Crime : बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर तिचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं कुटुंबातील सदस्य हादरून गेले आहेत. मृत बाळाचं नाव आरोही आनंद खोड असे आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड हादरलं! चिमुरडीचा गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला, त्याच ठिकाणी वडिलांचाही मृतदेह... हादरून टाकणारं प्रकरण

मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर...

मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेनं चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोही ही घरातच खेळत असताना तिने खाली पडलेले चॉकलेट तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट आरोहीच्या घरातच अडकले आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. कोवळ्या जीवावर चॉकलेटमुळे घटनेत हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान, बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक दुर्दैवी घटना घडताना उघडकीस येऊ लागल्या आहेत. अशातच आता ही घटना समोर आली आहे. 

हे ही वाचा : 'मी नपुंसक आहे, आमच्या वंशासाठी तुला माझ्या वडिलांसोबतच..' पंधरा दिवसानंतर नवरा बायको महाबळेश्वरला जाताच प्रकरण उघडलं

मुंबईत साडे तीन वर्षाच्या मुलाच्या फुफ्फुसात एलईडी बल्ब 

दरम्यान, अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. मुंबईतील जसलोक रुग्णालयत डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेल्या धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला, ज्यामुळे तीन महिन्यांपासून खोकला आणि श्वसनाचा त्रास दूर झाला. पीडित तरुण हा न्यूमोनियाच्या आजाराने ग्रस्त झाला होता, त्यानंतर त्याची लक्षणे कायम राहिली आहे. यानंतर सीटी स्कॅन करण्यात आले. त्यातच खोलवर धातूचा तुकटा आढळून आल्याचं दिसून आला.

 

    follow whatsapp