Beed Dowry : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातीन राजुरी मळा येथे घडली आहे. तरुणीच्या माहेरच्या मंडळींकडून लाखो रुपये घेतले. त्यानंतर मला तु आवडत नाही असं म्हणत नवऱ्याने तिच्याशी असलेली जवळीकता तोडण्याचा प्रयत्नही केला. अखेर तरुणीचा मृतदेह सासरच्या घराजवळील एका विहिरीत आढळून आला होता. मृत पत्नीचं नाव सोनाली बाळू वनवे असे आहे. तर नवऱ्याचं नाव अनिकेत गर्जे असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
"मुलगी आवडत नाही, तुझ्यासोबत राहायचे नाही"
सासरच्या लोकांनी मुलगी आवडत नाही, हिच्यासोबत राहायचे नाही असं म्हणत अनेकदा त्रास देण्यास सुरुवात केली. अनेकदा मारहाणही केली. तसेच पाच लाख रुपयांची मागणी देखील केली असता, तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला होता. सोनालीच्या आई वडिलांना सासरच्यांना पाच लाख रुपये देखील दिले, पण त्रास कमी झाला नाही.
सोनाली बेपत्ता झाली अन्...
अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, सासरी तिच्या घराशेजारी असलेल्या एका विहिरीत सोनालीचा मृतदेह आढळला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलिसांनी पंचनाम्यात नमूद केलं होतं. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आधी तरुणीला बाजूच्या सीटवर बसण्यास सांगितलं, तरुणीने दिला नकार अन् कॅब चालक कारमध्येच करू लागला हस्तमैथून
आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही हुंडाबळीमुळे अनेक विवाहित महिलांचे, तरुणींचे जीव गमावले गेले आहेत. अनेकांनी सासरच्या जाचाला आणि हुंड्याला बळी पडून आत्महत्या केली आहे. मध्यंतरी वैष्णवी हगवणे प्रकरणाने केवळ राज्याच नाही,तर देश हळहळला. त्यानंतर हुंडाबळीचे एक एक प्रकरण समोर येऊ लागले आहे.
ADVERTISEMENT
