बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

Beed Crime : एका नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वत:वरच गोळीबार करत आत्महत्या केल्याचा संशय आहे. आत्महत्या केलेल्या उपसरपंचाचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंचानं संपवलं जीवन

point

नेमकं काय घडलं?

Beed Crime : एका नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 38) यांनी स्वत:वरच गोळीबार करत आत्महत्या केल्याचा संशय आहे. आत्महत्या केलेल्या उपसरपंचाचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे. मृत उपसरपंचाने लाखो रुपयांची संपत्ती आणि दागिने सोणं नाणं नर्तिकेला दिले होते. याचा गैरफायदा घेत नर्तिकेने उपसरपंचाला अनेकदा ब्लॅकमेल केलंही. त्या त्रासातून उपसरपंच गोविंद यांनी स्वत:वर गोळीबार केल्याचा संशय आहे. 

हे ही वाचा : राज्यातील कोकण भागात पावसाचा लपंडाव, कधी ढगाळ तर कधी तपामानात वाढ, काय सांगतं हवामानशास्त्र?

नेमकं काय घडलं? 

यासंदर्भात फिर्याद नोंदवणाऱ्याने उपसरपंचाच्या मेहुण्यानं सांगितलं की, पूजाने भावजी गोविंद यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत प्रेमसंबंध ठेवले होते. त्यानंतर वेळोवेळी दागिन्यांसह जमीन जुमला नर्तिके घेऊन दिली होती. अनेकदा बलात्कार केल्याची धमकीही दिली. जर गेवराईतील शेतजमीन नावावर नाही केली तर मी बोलणार नाही, असे म्हणत अनेकदा ब्लॅकमेलही केलं होतं. तिने अनेकदा पैशांचीही मागणी केली असता, फिर्यादीचे भाऊजी गोंविद यांना बंदुकीने गोळी घालून आत्महत्या करण्यास परावृत्त केले. यामुळेच मेहुणा लक्ष्मण चव्हाणने पूजा देविदास गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला.

उपसरपंचाची आणि नर्तिकेची ओळख कशी झाली?

बीडच्या गेवराईत तालुक्यातील लखामसला येथील गोविंद बर्गे हा जमीन खरेदी विक्रीचे काम करायचा. त्यानंतर त्याता संपर्क पारगाव थिएटरमधील पूजा गायकवाड या नर्तिकेशी झाला होता. त्यांची जवळीकता वाढत केली. त्यांची मैत्री अधिक वाढत गेली. याचाच गैरफायदा नर्तिका पूजाने घेतला. याच काळात गोविंद बर्गे याने सोन्या नाण्यासह पावणे दोन लाखांचाही मोबाईल खरेदी करून दिला होता, अशी नवीन माहिती समोर आली आहे. यानंतर दोघांमध्ये अनेकदा वादविवाद होऊ लागला होता. त्यानंतर तो तरुणीच्या घरी आला होता.

हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योगाची निर्माती होणार, काही राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा

खून की आत्महत्या? 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली, तसेच घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर काही वस्तू जप्त केल्या होत्या. तेव्हा  पोलिसांना एक बंदूक सापडली होती. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp