Govt Job: लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? मग एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह पदांसाठी मोठ्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...

एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...

मुंबई तक

• 12:36 PM • 11 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाखोंच्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी...

point

एअरपोर्ट ऑथरिटी इंडिया (AAI) कडून निघाली 'ही' भरती

Govt Job: एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. AAI कडून ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह पदांसाठी मोठ्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 976 पदांवर नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आर्किटेक्चर/ इंजीनियरिंग/ टेक्नोलॉजी/ कंप्यूटर साइंस/ कंप्यूटर इंजीनियरिंग या आयटी (IT) संबंधित विषयात पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. यासोबतच, गेट (GATE) स्कोर सुद्धा आवश्यक आहे. म्हणजेच, फक्त पदवीधरच नव्हे तर भरतीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी GATE परीक्षेचा स्कोर देखील ग्राह्य धरला जाणार आहे. 

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसर व्हायचंय? मग RBI च्या 'या' भरतीची माहिती वाचाच अन् लवकरच अर्ज करा...

वयोमर्यादा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तसेच ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. यासोबतच, अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट असणार असल्याचं नमूद केलं आहे. 

किती मिळेल पगार?

या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.  याशिवाय, संबंधित पदांवर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना इतर सरकारी भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील. 

हे ही वाचा: मित्रासोबत मिळून प्रेयसीवर सामूहिक अत्याचार! नंतर बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन् शेवटी...

कसा कराल अर्ज? 

1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर होमपेजवरील 'RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES THROUGH GATE' या लिंकवर क्लिक करा. 
3. आता रजिस्ट्रेशन करा आणि यूजर आयडी तसेच पासवर्डच्या साहाय्याने लॉगिन करा. 
4. लॉगिन केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेसंबंधी माहिती भरा. 
5. त्यानंतर, आवश्यक डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा. 
6. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा. 
7. शेवटी, फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.

    follow whatsapp