मित्रासोबत मिळून प्रेयसीवर सामूहिक अत्याचार! नंतर बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या अन् शेवटी...
एका तरुणाने त्याच्या मित्रासोबत मिळून आपल्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मित्रासोबत मिळून प्रेयसीवर सामूहिक अत्याचार

प्रेयसीवर बलात्कार केला आणि बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या
Rape Case: उत्तर प्रदेशात एका तरुणाने तिच्या प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाने त्याच्या मित्रासोबत मिळून आपल्या प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी तरुणाने शेतात जाऊन आपल्या मित्रासोबत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर पीडितेसोबत बळजबरीने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर, उपचारादरम्यान, पीडितेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी (10 सप्टेंबर) एलएलआर रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि आरोपी प्रियकर तसेच त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. प्रकरणातील मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं, आपल्या मुलीचा सासरच्या लोकांसोबत वाद झाला असून ती दोन वर्षांपासून माहेरी राहत होती.
हे ही वाचा: महिलेचे हात-पाय बांधले अन्... 13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही मध्ये झालं रेकॉर्ड!
प्रियकरासोबत अनैतिक संबंध
मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, याच काळात गावात राहणाऱ्या 50 वर्षीय पुरुषासोबत पीडितेचे सूत जुळले. आरोपीचं नाव रामबाबू वाल्मिकी असून त्याने पीडितेसोबत अनैतिक संबंध बनवले. चार महिन्यांपूर्वी आपली मुलगी गर्भवली राहिल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं. प्रेयसी गरोदर राहिल्याचं कळताच रामबाबू तिच्याशी बोलणं टाळू लागला. त्यावेळी पीडितेचे कुटुंबीय आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना रामबाबूने शिवीगाळ केल्याचा देखील आरोपी पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
हे ही वाचा: दोघांचं लग्न ठरलं, पण होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी! पत्नीने नकार दिला अन् नंतर जे काही घडलं ते...
गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तब्येतीवर परिणाम...
गेल्या रविवारी रामबाबू आणि त्याचा मित्र गरोदर पीडितेला शेतात घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. यामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर, पीडित महिलेने तिच्या कुटुंबियांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सोमवारी महिलेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे, आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.